कोम्बींग ऑपरेशन दरम्यान घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक. दोन गुन्हयाची उकल

0
कोम्बींग ऑपरेशन दरम्यान घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक. दोन गुन्हयाची उकल

कोम्बींग ऑपरेशन दरम्यान घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक. दोन गुन्हयाची उकल

लातूर (एल.पी.उगीले) लातूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थे चा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून पोलीस प्रशासनाच्या वतीने कोंबिंग ऑपरेशन सुरू केले होते. यादरम्यान घरपुडीच्या गुन्ह्यातील आरोपी सापडले असून दोन गुणांची उकल झाली आहे. 

याबाबत थेडक्यात माहीती अशी की पोलीस स्टेशन गांधीचौक हददीमध्ये स्क्रैप मार्केट रोड,लातूर येथील शिवाजी ट्रेडर्स किराणा दुकानात व इतर काही दुकानाचे रात्री शटर उचकटून चोरी झाले संदर्भाने पोलीस स्टेशन गांधीचौक लातूर गुरनं. 128/2024 कलम 457,380 तसेच गुरनं.135/2024 कलम 457, 380 भा द वी प्रमाणे गुन्हे दाखल झालेले होते.
सदरचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधिक्षक सोमय मुंडे यांनी आदेशित केले होते. त्यावरून पोलीस अधिक्षक सोमय मुंडे, अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुधाकर देडे यांचे नेतृत्वात पोलीस ठाणे गांधीचौक डी.बी. पथकातील अधिकारी व अंमलदारचे पथक तयार करून त्यांना सखोल मार्गदर्शन व सुचना देण्यात आल्या होत्या. दि.09/03/2024 रोजी सदर पथकाने कोम्बींग ऑपरेशन दरम्यान कारवाई करत 60 फूटी रोड परिसरात हातात लोखंडी तलवार घेवुन फिरणाऱ्या इसमाला लोखंडी तलवार ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव गौस मुस्तफा सय्यद, (वय 26 वर्षे रा. बौध्दनगर, लातुर).
असे सांगीतले. त्या वरून पोलीस स्टेशन गांधी चौक गुरनं. 138/2024 कलम 4,25 भारतीय शस्त्र अधिनियम व सहकलम 137 मपोका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर आरोपीस डी.बी. पथकाने विश्वासात घेवून इतर चोरीच्या गुन्हयाबाबत कसून विचारपूस केली असता त्याने गेल्या दहा ते पंधरा दिवसात त्याचा साथीदार आसीफ जावेद पठाण (रा. आनंद नगर, लातूर).
व आणखीन साथीदार असे मिळून रात्रीचे वेळी मोटार सायकलवर बसून लातूर शहरातील डालडा फॅक्टरी जवळ व शिवाजी रोड परिसरातील वेगवेगळी दुकाने लोखंडी कटावणीने (रॉड) शटर उचकटून आत जावून रोख रक्कम पैशाची चोरी व काजू यांची चोरी केली आहे, असे सांगितले.
सदर गुन्हेगार हे रेकॉर्डवरील सराइत गुन्हेगार असून त्यांचेकडून इतर गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. गुन्ह्यातील इतर फरार आरोपींचा शोध सुरू असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल असे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक सोमय मुंडे, अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुधाकर देडे यांचे नेतृत्वात पोलीस ठाणे गांधीचौक डी.बी. पथकातील पोलीस उपनिरीक्षक अक्रम मोमीन, पोलीस अमलदर राजेंद्र टेकाळे, दामोदर मुळे, राम गवारे,दतात्रय शिंदे, रणविर देशमुख, शिवाजी पाटील, संतोष गिरी यांनी केलेली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *