आरक्षण योद्धा मनोज दादा जरांगे पाटील 12 तारखेला अहमदपूर येथे घेणार संवाद मेळावा
सायं 8 वाजता जिजाऊ मंगल कार्यालय चामे गार्डन येथे होणार संवाद मेळावा
सायं 5 वाजता शिवशाहीर राजेंद्र कांबळे खडूसकर यांचा पोवाडा
अहमदपूर (गोविंद काळे) : सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी व मराठा समाजाला ओ बी सी प्रवर्गातून आरक्षण द्यावे या मागणीवर ठाम असणारे आरक्षण योद्धा श्री मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्र पिंजून काढत आहेत त्याचाच एक भाग म्हणून येत्या 12 मार्चला सायंकाळी 8 वाजता अहमदपूर येथील जिजाऊ मंगल कार्यालय,चामे गार्डन थोडगा रोड येथे मराठा समाजाचा संवाद मेळावा होणार असून यासाठी शहर व तालुक्यातील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सकल मराठा समन्वय समिती अहमदपूर यांच्यातर्फे करण्यात आले आहे
मराठा आरक्षण आंदोलनामध्ये नेहमीच सक्रिय असलेल्या अहमदपूर तालुका मध्ये यापूर्वी ही मनोज दादा जरांगे यांची भव्य सभा आयोजित करण्यात आली होती व तब्बल 42 दिवस साखळी उपोषण अहमदपूर येथे करण्यात आले होते याही संवाद मेळाव्यासाठी जय्यत तयारी करण्यात येत असून गावोगावी जाऊन समनव्यय समिती च्या वतीने मेळाव्याचे अवतन देण्यात येत आहे
मराठा आरक्षण बाबत सरकारने दिलेल्या शब्द पाळला नसल्याबद्दल समाज बांधवांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून सरकार विरोधात प्रचंड असंतोष पाहायला मिळत आहे
काही दिवसापूर्वी झालेल्या रस्ता रोको आंदोलनामध्ये येथील काही स्वयंसेवकावर गुन्हे नोंद झाल्याने समाज बांधवांमध्ये रोशाचे वातावरण निर्माण झाले आहे म्हणून या मेळाव्यासाठी हजारोंच्या संख्येने समाज बांधव व भगिनी यांचा सहभाग असेल महिलांची बसण्याची व्यवस्था व्हावी म्हणून जिजाऊ मंगल कार्यालय महिलांसाठी चोख व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती समन्वय समितीच्या सदस्यांनी यावेळी दिली.