आरोग्य विभागाकडून आशा व गटप्रवर्तकांचा सत्कार
अतनूर (एल.पी.उगीले) : जळकोट तालुका आरोग्य विभागाच्या वतीने पंचायत समितीच्या सभागृहात जागतिक महिला दिन व आशा दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र अतनूर अंतर्गत २८ गावातील तांडा-वाडी-तांडा-वस्तीतील अतनूर, गव्हाण, गुत्ती, घोणसी, तिरूका ५ उपकेंद्र अंतर्गत तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आशा व गटप्रवर्तकांचा जळकोट तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पवार, वांजरवाडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मल्लिकार्जुन बिराजदार व अतनूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम सागडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.