सचिन गोडबोले यांची एमपीएससीतून अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल सत्कार संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : सचिन शिवराज गोडबोले यांनी 2022 मध्ये झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग तर्फे घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र इंजीनियरिंग सर्विसेस यामध्ये 19 रँक प्राप्त करून घवघवीत यश संपादन केले आहे. त्यांची सहाय्यक अभियंता श्रेणी 2 या पदावर जलसंपदा विभागात (राजपत्रित अधिकारी) म्हणून निवड झाली आहे. त्याबद्दल त्यांचा कदम परिवाराच्या वतीने कवी, कथाकार ,वात्रटिकाकार, समीक्षक ,संपादक तथा सामाजिक कार्यकर्ते प्रा. डॉ. कदम नरसिंग अप्पासाहेब यांनी सहकुटुंब सत्कार केला. सचिनने अतिशय मेहनत करून, प्रयत्नांची पराकाष्टा करून, अविरतपणे अभ्यास करून आपले हे ध्येय साध्य केलेले आहे. या संघर्षाच्या काळामध्ये कोरोना सारखी महामारी भारतामध्ये आलेली असताना आपल्या अभ्यासावर त्यांनी परिणाम न होऊ देता आपले सातत्य राखून हे यश संपादन केले आहे. सत्काराला उत्तर देत असताना सचिन म्हणाले, भारत देशासाठी मला जे चांगले कार्य करता येते ते मी माझ्या या सेवेतून करणार आहे. माझ्या आई-वडिलांनी खूप मेहनत करून मला योग्य दिशा दिली म्हणूनच हे एस मी संपादन केले असेही ते म्हणाले. यावेळी या कार्यक्रमाला सौ गोदावरी नरसिंगराव कदम,शिवराज काशिनाथ गोडबोले, सौ इंदुमती शिवराज गोडबोले,किरण नागोराव लद्दे, सौ पूजा किरण लद्दे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील राजकुमार हनमशट्टे यांनी तर आभार
प्रवीण शिवराज गोडबोले यांनी मानले.