तोंडार येथील नेहरू मेमोरियल हायस्कूल तालुक्यातून द्वितीय
उदगीर (एल पी उगीले) : उदगीर तालुक्यातील मौजे तोंडात येथील नेहरू मेमोरियल हायस्कूल ही शाळा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेत उदगीर तालुक्यातून द्वितीय आली आहे. यामुळे या शाळेला दोन लाख रुपये बक्षीस जाहीर झाले आहे. सर्व गुणसंपन्न असणाऱ्या नेहरू मेमोरियल हायस्कूलच्या चमकदार कामगिरीचे तालुक्यात कौतुक होत आहे. उदगीर तालुक्यात ग्रामीण भागात ग्राम शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित नेहरू मेमोरियल हायस्कूल ची स्थापना 1954 साली झाली. स्थापनेपासून शाळेच्या गुणात्मकतेत वृद्धीच होत गेली आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून शाळा गतिमान झाली आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत तालुकास्तरीय समितीने शाळेची भेट घेऊन सर्व उपक्रमांचा तपशीलवार आढावा घेतला, पहाणी केली. शाळेने सर्व निकष पूर्ण करून केंद्रात प्रथम तर तालुक्यात सर्व द्वितीय क्रमांक पटकावला. शाळेच्या यशाबद्दल सर्वांचे मार्गदर्शन लाभले असे विचार संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार मनोहर पटवारी, उपाध्यक्ष बसवराज बिरादार, सचिव मल्लिकार्जुन बिरादार व संस्थेचे सर्व सदस्य तसेच शिक्षणाधिकारी माध्यमिक नागेश मापारी, शिक्षणाधिकारी प्राथमिक वंदना फुटाणे, गटशिक्षणाधिकारी एस के शेख, शिक्षण विस्तार अधिकारी नितीन लोकरे, केंद्रप्रमुख मरलापल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश शेटकर यांच्या योग्य व्यवस्थापनामुळे आणि सर्व कर्मचाऱ्यांनी यथायोग्य साथ दिल्यामुळे शाळेला हा पुरस्कार मिळाल्याचे शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने सांगण्यात येत आहे.