नागेंद्र भारती मठात विस लाख रुपयाच्या विकास कामाचे मान्यवरांच्या हस्ते भुमिपुजन
अहमदपूर (गोविंद काळे) : अक्कलकोट च्या स्वामी समर्थाचे गुरू नागेंद्र भारती मठात विविध विकास कामाचे भुमिपुजन मान्यवरांच्या हस्ते आज संपन्न झाले. अहमदपूर शहरातील ब्राह्मण गल्ली मध्ये ज्याज्वल्य असलेल्या नागेंद्र भारती मठात अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांनी नागेंद्र भारती यांचे शिष्य म्हणून पाच वर्षे वास्तव्यास होते.
मठाच्या विकास कामासाठी प्रादेशिक पर्यटन विभाग महाराष्ट्र राज्या कडून लोकप्रिय खासदार सुधाकरराव श्रृगांरे यांच्या शिफारशी नुसार व भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद गिरी यांच्या पाठपुराव्यामुळे नागेंद्र भारती मठ संस्थानच्या विकास कामासाठी विस लाख चार हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला असल्याने आज दि. 11 मार्च रोजी मान्यवरांच्या हस्ते भुमिपुजन करण्यात आले.
भुमिपुजन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष दिलीपराव देशमुख हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार बब्रुवान खंदाडे, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके पाटील, माजी सभापती अशोक काका केंद्रे, माजी नगराध्यक्ष अॅड. भारत चामे, ओबीसी मोर्च्याचे प्रदेश सचिव ज्ञानोबा बडगिरे, भाजपाचे शहराध्यक्ष सुशांत गुणाले,युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष रामानंद मुंडे, युवा कीर्तनकार अविनाश भारती,पोलीस उपनिरीक्षक स्वातीताई जाधव,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोलकुमार आंदेलवाड, विस्तार अधिकारी धनाजी सुळे, ज्ञानेश्वर कोटगिरे , माजी उपनगराध्यक्ष अभय मिरकले,परमेश्वर आढाव, महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षा पुष्पाताई तेलंग, महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्षा जयश्री केंद्रे, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा कल्पना महाजन यांच्या अनेकजण उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करुण आभार भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद गिरी यांनी मानले.
भुमिपुजन कार्यक्रम यशस्वीतेसाठी नागेंद्र भारती मठ संस्थानचे मठाधिपती रमेश भारती, ग्यानगिर गिरी, बालाजी गिरी, श्रीधर गिरी, मुरलीधर भारती, सुरेश गिरी, संजय भारती, संजय पुरी, संकेत गिरी, विजय पुरी, शिवा भारती, शिवाजी गिरी, बळी पुरी,हणमंत गिरी, सतिश गिरी, सुरेंद्र गिरी,सुमीर भारती,चंचल भारती,राजेंद्र गिरी, विष्णू पुरी, शंभू देव भारती, काशीगिर गिरी, गोकुळ पुरी, राहुल गिरी, सोनू गिरी, बब्रुवान गिरी, संतोष गिरी यांच्या सह अहमदपूर तालुक्यातील गोसावी समाज बांधवांनी परीश्रम घेतले. महाप्रसादा नंतर कार्यक्रमाची सांगता झाली.