सुशिल वाघमारे राष्ट्रीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित

0
सुशिल वाघमारे राष्ट्रीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित

सुशिल वाघमारे राष्ट्रीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित

चाकूर (गोविंद काळे) : येथील शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणारे सुशिल रंगनाथ वाघमारे यांना रविवारी पुणे येथे राष्ट्रीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. काव्यमित्र संस्था पुणे यांच्या वतीने प्रतिवर्षी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय गुणवंत शिक्षक पुरस्कार देण्यात येतो. पुरस्काराचे हे २४ वे वर्ष आहे. या वर्षीचा पुरस्कार सामाजिक , सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणारे आदर्श शिक्षक, सुशिल रंगनाथ वाघमारे स्वामी विवेकानंद विद्यालय, चापोली यांना पुणे येथील सायन्स पार्क तारांगण येथे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी शिरीष पोरेडी ( कार्यकारी अभियंता पिंपरी चिंचवड मनपा), रश्मी कुमार अब्रोल (ज्येष्ठ कृषी तज्ञ पुणे), डॉ. अंजली शिवदे(प्रसिद्ध डॉक्टर पुणे) ॲड. मधुरा देशपांडे प्रसिद्ध कायदा तज्ञ पुणे, सुचित्रा साठे, राजेंद्र सगर संस्थापक काव्यमित्र संस्था पुणे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. सुशील वाघमारे हे मागील तेरा वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. आनंददायी शिक्षण देऊन विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचा कार्य ते करत आहेत. कब बुलबुल,स्काऊट गाईड, चित्रकला, हस्तकला याचबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ते प्रयत्नशील असतात. यापूर्वी त्यांना ‘लातूर भूषण पुरस्का, विठ्ठलराव शिंदे गुरुजी स्मृती पुरस्कार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, जिल्हा परिषद माहोरवाडी द्वारा ज्ञानरत्न प्रेरणा पुरस्कार प्राप्त झाले आहेत. महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी जनसामान्यांच्या घरात शिक्षणाची गंगा पोहोचली म्हणून आज अनेक वेळा आनंदाने शिक्षण घेत आहेत याचा ध्यास उराशी बाळगून सुशिल वाघमारे शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करत आहेत. या कार्याची दखल घेऊनच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मृतिदिनाच्या औचित्य साधून संस्थेने चोविसाव्या वर्षी आयोजित केल्या या कार्यक्रमात 2024 या वर्षाचा राष्ट्रीय गुणवंत शिक्षक पुरस्कार सुशील रंगनाथ वाघमारे यांना आदरपूर्वक प्रदान करण्यात आला. याबद्दल सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांच्या वतीने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

“सुशील वाघमारे यांनी हा पुरस्कार या विद्यार्थ्यांमुळे प्राप्त झाला आहे त्या विद्यार्थ्यांना समर्पित केला आहे”.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *