मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय एक इंच ही मागे सरकणार नाही – मनोज जरांगे पाटील

0
मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय एक इंच ही मागे सरकणार नाही - मनोज जरांगे पाटील

मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय एक इंच ही मागे सरकणार नाही - मनोज जरांगे पाटील

अहमदपूर (गोविंद काळे) : वाशी नवी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी सगे सोयरे संबंधी जो शब्द दिला होता तो शब्द या सरकारने पाळला नसून पुनश्च एकदा मराठ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम या सत्ताधाऱ्यांनी केले आहे मात्र यावेळी गाठ यांचे मनोज जरांगे पाटलांची आहे हे सरकारने लक्षात ठेवावं लवकरात लवकर सगे सोयरे संबंधित अध्यादेश लागू करावा अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलनाचा सामना या सरकारला करावा लागेल असा गर्भित इशारा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अहमदपूर येथील जिजाऊ मंगल कार्यालय चामे गार्डन थोडगा रोड येथे सकल मराठा समाज बांधवा अहमदपूरच्या वतीने आयोजित केलेल्या संवाद मेळाव्यात ते बोलत होते.
पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले की सरकार जर मराठा समाजास मागास मानत असेल तर मागास प्रवर्गाच्या बाहेर संरक्षण का दिल आणि ते 30 टक्के लोकसंख्या असलेल्या मराठा समाजास दहा टक्के आरक्षण हे कुठल्या धरतीवर दिले महाराष्ट्रामध्ये असे अनेक प्रकरणे प्रलंबित असताना माज्यासारक्या सर्वसामान्य मराठा बांधवावर एसआयटी नेमण्याची घाई नेमकी का केली जाते यामागे कुठेतरी हे आंदोलन यामागे कुठेतरी हे आंदोलन दडपण्याचा कावा रचला जातोय आणि ह्या काव्या पासून सकल मराठा समाजाने सतर्क राहावं असे आवाहन आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले.
यावेळी मुस्लिम व दलित समाज बांधव यांच्या वतीने पाटील यांचा सत्कार करण्यात आला प्रास्ताविक जयराम पवार हंगरगेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन दयानंद पाटील यांनी केली तर सूत्रसंचालन ऍड आनंद जाधव ,मारुती बुद्रुक पाटील ,गजानन गुरुनाळे यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *