फडणवीस याना सुट्टी नाही, समाज एकवटला आहे – मनोज जरांगे पाटील
अहमदपूर (गोविंद काळे) : येथे संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत बोलताना मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे.बैठक झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारच्या भूमिकेमुळे समाजा एकवटला आहे ..त्यांना आता सुट्टी देणार नाही..येत्याकळत आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
माध्यमांशी बोलताना काय म्हणाले मनोज जरांगे मी समाजाचा माणूस आहे ..शरद पवार,देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, बच्चु कडू प्रकाश आंबेडकर यांचा माणूस आहे असे आरोप होत आहेत मात्र मी फक्त समाजाचा आहे. मी कोणाचे ऐकत नसतो. शरद पवार जर आरक्षणाच्या विरोधात बोलले तर उद्या पासून त्याच्याही विरोध करू देवेंद्र फडणवीस यांच्या वागणुकीमुळे समाज मोठ्या प्रमाणात एकत्र आला आहे. त्याच्यासाठी हे आता जड जाणार आहे. तुम्ही एस आय टी चौकशी सुरू केली आहे. काय चुकले आमचे तुमच्या आयुष्यातील ही सर्वात मोठी चूकतुमचे राजकीय अस्तित्व धोक्यात आहे. एकनाथ शिंदे बरोबर चर्चा होऊन आरक्षण देण्यात आले आहे. मात्र तुम्ही सतत या बाबत देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात भूमिका घेता असे का ? देवेंद्र फडणवीस यांच्या बाबत मी कधी ही भूमिका घेतली नव्हती मात्र त्यांनी खोटे गुन्हे दाखल केले.ट्रॅप रचला म्हणून विरोध आहे.
तुम्ही शरद पवार यांचे माणूस आहे असा आरोप होत असतो. ते जर उद्या मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलले तर त्यांना ही घेतो. हि संवाद बैठक आहे लोक एकत्र झाले आहेत..आता त्याचे राजकीय फटका सगळ्यांना बसेल. गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात हलला करण्याची योजना आहे का? मला गरज नाही पोलिसाची माझी जात सज्ज आहे. मराठा आमदार मंत्री हे पक्षाचे काम करतायत. जातीच्या आदोळणात तुम्ही सहभागी होणार का नाही हे पहाणार आहे समाज
हजारो लोक लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवारी दाखल करण्यात येत आहे हा समाजाचा विषय तो माझा नाही. त्यांना अधिकार आहे. पाच पन्नास लोक उभे राहतील तो त्याच्या हातात आहे. दोन हजार एकर पार्किंग आणि नऊशे एकर जागा सभेसाठी लागणार आहे. ते ठिकाण ही सांगण्यात येईल.