उदगीरचे कुस्ती संयोजन लय भारी! खेळाडूंसह कुस्तीशौकिनांकडून आयोजकांचे कौतुक
उदगीर (एल.पी.उगीले) : आंतरराष्ट्रीय दर्जाला साजेल असे स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल खेळाडूंसह लातूरमधील कुस्तीशौकिन स्पर्धा आयोजकांचे कौतुक करीत आहेत. क्रीडा व युवक कल्याण सेवा संचलनालयाने आयोजित स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा प्रथमच उदगीरमध्ये संपन्न झाली. जिल्हा परिषद मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेच्या भव्य उद्घाटना पासून आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसारखा दर्जा बघून कुस्तीशौकिन भारावून जात आहेत. अवघ्या चार दिवसांत यशस्वी संयोजनाचे शिवधनुष्य पेलल्याबद्दल एसजीए कंपनीचे गौतम छेड्डा यांचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी उद्घाटन समारंभात जाहिर कौतुक केले आहे. स्वःत गौतम छेड्डा यांना व्यासपीठावर बोलवून संजय बनसोडे यांनी त्यांना शाबासकी दिल्याचे सर्वांनी पाहिले आहे.
पाच दिवस चाललेल्या स्पर्धेत खेळाडूंची निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था अतियश उत्तम करण्यात आली होती. तीन मॅटवरील कुस्ती आखाडे, तीन व्यासपीठ, भोजनाचे बंदिस्त मंडप आणि तीन दिशांना असलेली प्रेक्षक गॅलरीसह समारंभासाठी असलेले व्यासपीठ अशी आखाड्याची भव्य रचना एसजीए कंपनीने केवळ ५० तासांत पूर्ण करण्याचे आव्हान पेलले. व्यासपीठ उभे केल्यानंतर प्रख्यात अभिनेत्री शेफाली जरीवाला यांच्या नृत्य अविष्कारासह लेझर शो व नयनरम्य आतिषबाजीचा आनंद उदगीरकरांनी अनुभवला. स्पर्धेचे तीनही दिवस सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी प्रथमच खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रेक्षकांना मिळाली. क्रीडा व युवक कल्याण सेवा संचलनालयातून उपसंचालक संंजय सबनीस, व उदय जोशी हे स्वतः स्पर्धेसाठी हजर होते. शासनाकडूनही एसजीए कंपनीचे गौतम छेड्डा यांच्या यशस्वी नियोजनाचे कौतुक होत आहे.
एसजीए कंपनीनी यापूर्वी नाशिकमधील राष्ट्रीय युवा महोत्सव, गोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, पुण्यातील महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धा, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, हरियाणा व पुण्यातील झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेच्या संयोजनात मोलाची भूमिका बजावली होती. आता उदगीर मधील स्पर्धा यशस्वी करून एसजीए कंपनीच्या मराठवाड्यातील क्रीडा शौकिनांची मने जिंकली आहेत.