खा. सुधाकर शृंगारे यांच्या निस्वार्थी कामाची भाजपा पक्षश्रेष्ठीकडून दखल – आ. कराड

0
खा. सुधाकर शृंगारे यांच्या निस्वार्थी कामाची भाजपा पक्षश्रेष्ठीकडून दखल - आ. कराड

खा. सुधाकर शृंगारे यांच्या निस्वार्थी कामाची भाजपा पक्षश्रेष्ठीकडून दखल - आ. कराड

लातूर (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय आणि प्रदेश स्तरावरील नेतृत्वाने खा. सुधाकर शृंगारे गेल्या पाच वर्षात निस्वार्थ भावनेतून लातूर लोकसभा मतदारसंघात केलेल्या कामाची दखल घेऊन पुन्हा एकदा उमेदवारी देऊन काम करण्याची संधी दिली असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी व्यक्त केली.

लातूर लोकसभा मतदार संघात प्रामाणिक, निस्वार्थी, आणि जनहिताच्या प्रश्नासाठी आवाज उठवणारे व्यक्तिमत्व म्हणून खासदार सुधाकर शृंगारे यांच्याकडे पाहिले जाते. गेल्या पाच वर्षात मतदार संघातील अनेक विकास कामांना न्याय देण्याची भूमिका घेतली विविध प्रकल्प कार्यान्वित व्हावे याकरिता मेहनत घेतली. राष्ट्रीय प्रश्नावर देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांना वेळोवेळी साथ दिली.
गेल्या पाच वर्षात सर्वांशी स्नेहाचे संबंध ठेवून केलेल्या कामाची दखल घेऊन लातूर लोकसभा मतदार संघातून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार खा. सुधाकरजी शृंगारे यांची पक्षाच्यावतीने अधिकृत घोषणा करण्यात आली. जनसामान्यांच्या मनातील उमेदवार मिळाल्याने मतदारात उत्साहाचे वातावरण असून मागील वेळेपेक्षा यावेळी प्रचंड मोठ्या मताधिक्याने शृंगारे विजय होतील अशी अपेक्षा व्यक्त करून भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी खा. सुधाकर शृंगारे यांना लातूर लोकसभेची उमेदवारी दिल्याबद्दल भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय जे. पी. नड्डा साहेब, राष्ट्रीय सचिव माननीय विनोदजी तावडे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रदेशाचे अध्यक्ष माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब व इतर सर्व मान्यवर नेत्यांचे जाहीर आभार व्यक्त केले आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *