कै. रसिका महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन
देवणी (प्रतिनिधी) : नवीन शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणीसाठी पारंपरिक शिक्षणासोबतच कौशल्याधारित वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रत्यक्ष कामाचे कौशल्य मिळणे काळाची गरज आहे यासाठी केंद्रशासन आणि महाराष्ट्र शासनाच्या संकल्पनेतून कौशल्य प्रशिक्षणाद्वारे रोजगार क्षमतेचे वृद्धी, औद्योगिक आस्थापनांच्या गरजेनुसार प्रशिक्षण सॉफ्ट स्कीलचे प्रशिक्षण, स्किल गॅप नुसार कौशल्य विकास प्रशिक्षण, वंचित गरजू विद्यार्थ्यांचे सक्षमीकरण, जागतिक स्पर्धात्मक तयारीसाठी तंत्रज्ञानाचा प्रगतीचा अवलंब करणे यासाठी देवणी येथील कै. रसिका महाविद्यालयात महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त ‘महाविद्यालय कौशल्य विकास’ केंद्राचे ऑनलाईन उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते करण्यात आले. महाविद्यालय कौशल्य विकास केंद्र महाराष्ट्र शासनाची मान्यता मिळण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. गोविंदरावजी भोपणीकर साहेब, संस्थेचे सचिव मा. श्री. गजाननजी भोपणीकर साहेब यांचे मार्गदर्शन आणि सकारात्मक प्रयत्न लाभले आहेत. यावेळी लातूर येथील सेवा योजना कार्यालयाचे ज्ञानेश्वर कांबळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत जावळे यांनी विद्यार्थ्यांना नवीन कोर्सेस बाबत सविस्तर माहिती दिली व जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थ्यांनी या विविध कोर्सेसना प्रवेश घ्यावा असे आवाहन केले. यावेळी उपप्राचार्य डॉ. शिवाजी सोनटक्के यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. डॉ. गोपाल सोमानी यांनी केले.