नियोजन विभागातुन मतदार संघातील विविध विकास कामांसाठी १५ कोटींचा निधी मंजूर, ना.संजय बनसोडे यांची माहिती
उदगीर (एल.पी.उगीले) : मतदार संघातील विविध विकास कामांसाठी कोट्यावधी रुपयाचा निधी मंजूर करून काही कामे पूर्ण झाली तर काही विकास कामे पुर्णात्वाकडे जात आहेत. त्यातच मतदार संघातील उर्वरीत कामांसाठी महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभाग अंतर्गंत
नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात अधिसुचित विशिष्ट नागरी सेवा व सुविधा पुरविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला असुन उदगीर व जळकोट मतदार संघातील विविध कामांसाठी तब्बल १५ कोटी रुपयाचा निधी मंजूर केला असल्याची माहिती राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे.
नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात नागरी सेवा व सुविधेची कामे करण्यासाठी “महानगरपालिका क्षेत्रात नागरी सेवा व सुविधेची कामे” व “नगरपालिका,नगरपंचायत क्षेत्रात नागरी सेवा व सुविधेची कामे” या योजनां येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.त्याअंतर्गत करावयाच्या कामांसाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.
नियोजन विभागातुन उदगीर व जळकोट मतदार संघातील कामांसाठी निधी उपलब्ध करुन दिला असुन त्यामध्ये उदगीर शहरातील पत्रकार भवन बांधकामांसाठी ४ कोटी रु, सिध्दरामेश्वर मंदीर, उदगीर विकसीत करणे १ कोटी, ईदगाह मैदान, उदगीर येथे कंपाऊंट वॉल करणे १ कोटी रु, शहरातील रेणुकाचार्य संस्कार भवनाच्या उर्वरीत बांधकामासाठी १ कोटी, उदगीर येथील गवळी समाज स्मशानभुमी येथील उर्वरीत काम करण्यासाठी २० लक्ष रु, सहजीवन सोसायटी, उदगीर येथील गार्डन विकसीत करण्यासाठी २० लक्ष रु., उदगीर येथील रोकडे हनुमान मंदीर कडे जाणारा उर्वरीत रस्ता सिमेंट कॉक्रीट करण्यासाठी ५० लक्ष रु, उदगीर शहरातील शाहू चौक ते कल्पना टॉकीज चौक पर्यंत स्ट्रीट लाईट बसविणे व रस्ता दुभाजक करणे ५० लक्ष रु., म.फुले नगर, उदगीर येथे वडार समाजाचे सभागृह बांधकाम करण्यासाठी ३० लक्ष रु, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, उदगीर येथील सुशोभिकरण व उर्वरित काम करण्यासाठी ५० लक्ष रु., पारकट्टी गल्ली, उदगीर येथे चौकीमठ बांधकाम करण्यासाठी १ कोटी रु., उदगीर येथील प्रभाग क्र. ०७ येथे शाह सैलानी दर्गा येथे सुशोभिकरण करणे, उदगीर येथील गणेश मंदीर समतानगर, वरील मजला सुशोभिकरण करणे २५ लक्ष रु., जयवीर हनुमान मंदीर, रघुकूल मंगल कार्यालयासमोर उदगीर सभागृहाचे उर्वरीत बांधकाम करणे २५ लक्ष रु., गणेश मंदीर, उदगीर नई अबादी परिसर येथे सुशोभिकरण करणे २५ लक्ष रु.,
उदगीर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर अशोक स्तंभ उभा करण्यासाठी ५० लक्ष रु., उदगीर येथील जिजामाता मंदीर परिसर सुशोभिकरण व विकसीत करणे २० लक्ष रु., उदगीर येथे १३५ मीटर उंचीचा राष्ट्रध्वज उभारणी करण्यासाठी
६० लक्ष रु., उदगीर येथे मुसा नगर प्रभाग क्र. १० मध्ये सभागृह पहिला मजला व सुशोभिकरण करणे ५० लक्ष रु., जळकोट शहरातील मराठा भवनचे उर्वरीत बांधकाम करण्यासाठी १ कोटी रु., जळकोट शहरातील श्री राम मंदीर बांधकाम करणे ५० लक्ष रु., लिंगायत भवन जळकोट येथे उर्वरित इलेक्ट्रिक काम करण्यासाठी २० लक्ष रु., जळकोट शहरातील बौध्द विहार येथे उर्वरित इलेक्ट्रिक काम करण्यासाठी १५ लक्ष रु., जळकोट शहरातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सभागृह येथे उर्वरित इलेक्ट्रिक काम करण्यासाठी १५ लक्ष रु., असे एकुण १५ कोटी रुपयाचा निधी क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी मंजूर केला आहे.
सदर निधी मंजूर केल्याबद्दल मतदार संघातील नागरिकांनी ना.संजय बनसोडे यांचे अभिनंदन करुन आभार व्यक्त केले आहेत.