डॉक्टर आणि कर्मचारी मुक्कामी राहत नाहीत !! तरीही, हंडरगुळीच्या प्रा.आ.केंद्रास जि.प.चा कायाकल्प पुरस्कार प्रदान !!!

0
डॉक्टर आणि कर्मचारी मुक्कामी राहत नाहीत !! तरीही, हंडरगुळीच्या प्रा.आ.केंद्रास जि.प.चा कायाकल्प पुरस्कार प्रदान !!!

डॉक्टर आणि कर्मचारी मुक्कामी राहत नाहीत !! तरीही, हंडरगुळीच्या प्रा.आ.केंद्रास जि.प.चा कायाकल्प पुरस्कार प्रदान !!!

हंडरगुळी (विठ्ठल पाटील) : उदगीर तालुक्यातील हंडरगुळी येथील प्राथ. आरोग्य केंद्रास जि.प.स्तरावरील कायाकल्प पुरस्कार मिळाला आहे. पण आजही अनेकदा डाॅक्टर मुक्कामी राहत नसल्याने स्थानिक व बाहेर गावचे कांही कर्मचारी पण या दवाखाण्याचे असलेल्या हायफाय क्वाॅर्टर मध्ये मुक्कामी राहत नाहीत. त्यांचे काय?तसेच मुक्कामी राहणे बंधनकारक असतानाही अप-डाऊन करणारे अनेक कर्मचारी हे घरभाडे कशाच्या व कुणाच्या आधारावर शासनाकडून घेतात?याचा शोध घेऊन कार्यवाही करण्याची धमक जिल्हा आरोग्य अधिका-यानी दाखवावी.अन्यथा या गावातील नागरिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. जि.प.च्या आरोग्य खात्याने नुकताच जिल्ह्यातील कांही प्रा.आ.केंद्रांना कायाकल्प पुरस्कार जिल्हा आरोग्य अधिकारी स्तरावर जाहीर केला.यात हंडरगुळीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचाही समावेश आहे.कारण जि.प.च्या या योजनेचे निकष पुर्ण केल्याबद्दल हा पुरस्कार मिळाला असला तरीही या प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्री अपरात्री येणारे बहूतांश रुग्ण हे गंभीर स्वरूपाचे रुग्नच असतात.आणि अनेक वेळा रात्री येथे डाॅक्टरच बेपत्ता असतात, परिणामतः नोकरीवर सकाळी नऊ वाजता येणे बंधनकारक असले तरी अनेकदा दहा, साडेदहा वाजुन गेले तरीही डाॅक्टर हजर नसतात.म्हणुन कांही कर्मचारी मंडळीही मनमानी करत असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. अनेक वेळा डाॅक्टरसह कर्मचारी मंडळी पण बेपत्ता होतात.अशी चर्चा कांही रुग्णांच्या नातेवाईकात होत आहे.तेंव्हा कायाकल्प पुरस्कार मिळालेल्या या दवाखान्यात असलेल्या या व अन्य समस्याकडे जि प.आरोग्य अधिकारी लक्ष देणार कधी? डाॅक्टर अभावी एखादा रुग्न दगावल्यावर का? असे प्रश्न हाळीसह परिसरातील जनतेतून उपस्थित केले जात आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!