शेख सालिक रिजवान हुसेन तीन सुवर्ण पदकाने सन्मानित
लातूर (एल.पी.उगीले) : पोदार इंटरनॅशनल स्कूल अंबाजोगाई शाळेचा विद्यार्थी शेख सालिक रिजवान हुसेन याला तीन सुवर्ण पदक देऊन सन्मानित करण्यात आले.भारत सरकार द्वारा प्रमाणित,हिंदी ऑलिम्पियाड फाऊंडेशन न्यू दिल्ली, यांच्यातर्फे 24 ऑगस्ट 2023 रोजी घेण्यात आलेल्या इंटरनॅशनल हिंदी ऑलिम्पियाड परीक्षा इयत्ता तिसरी मध्ये शेख सालिक याने प्रथम क्रमांक मिळवला.तसेच इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स ऑलिम्पियाड परीक्षेत तिसरा क्रमांक मिळवला.आणि मुथाई स्पोर्ट्स असोसिएशन लातूर तर्फे घेण्यात आलेल्या पहिले मराठवाडा मुथाई चॅम्पियनशिप मार्शल आर्ट स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला.यानिमित्त त्याला मान्यवरांकडून तीन सुवर्ण पदक देऊन गौरविण्यात आले.याप्रसंगी व्यासपीठावर मुख्याध्यापक कीर्तिकुमार देशमुख, पोदार प्रेप च्या मुख्याध्यापिका अनुराधा शिंदे,रसाळ, ज्योती स्वामी,रेणु झिरमिरे,जागृती चव्हाण,सागर केंद्रे,दिक्षा,रंजना सोनवणे ,शेख राशीद,सय्यद आमील,सय्यद मुखीद,नलिनी पाटील,कल्पना मुंडे ,क्रांती कुलकर्णी व ईतर मान्यवर उपस्थित होते.या दैदीप्यमान यशामध्ये सालिक ला आई-वडील यांच्यासोबतच त्याचे मार्गदर्शक शिक्षक पूनम गुजर ,स्मिता बुरांडे ,चौधरी सीमा,सय्यद मुखीद यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे तो सांगतो.दिलदार फाऊंडेशन बीड चे संस्थापक अध्यक्ष शेख दिलदार शेख ईस्माईल यांचा नातू असलेला शेख सालिक याने इयत्ता पहिली मध्ये महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेत राज्यात दुसरा तर इयत्ता दुसरी मध्ये ज्युनियर आय.ए.एस. परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळवले होते. भविष्यात क्लास वन अधिकारी बनुन देश सेवा करणार असल्याचे मनोगत यावेळी शेख सालिक रिजवान हुसेन ने व्यक्त केले.या देदीप्यमान यशाबद्दल शेख सालिक चे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.