संविधानाच्या रक्षणासाठी व संवर्धंनासाठी पुढाकार घ्या – मारूती गुंडीले

0
संविधानाच्या रक्षणासाठी व संवर्धंनासाठी पुढाकार घ्या - मारूती गुंडीले

संविधानाच्या रक्षणासाठी व संवर्धंनासाठी पुढाकार घ्या - मारूती गुंडीले

देवणी (प्रतिनिधी) : संघर्षमय जीवनावर मात करुन सन्मानाने जगण्याचा निर्धार करुन समदु:खी, समविचारी एकल महिलांनी एकजुटीतुन उभारलेल्या एकल महिला संघटना जळकोट च्या वतीने महिला व एकल महिला चा जीवन संघर्ष व त्यावर उपाय या चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते.भारतिय संविधान हा देशाचा आत्मा आसुन त्यांनी एकल महिलांना सुध्दा सन्मानाने जगण्याचा आधिकार दिला आहे. भारत देशाचे पवित्र संविधान आपली जन्मा पासुन मृत्यु पर्यंत काळजी घेऊन रक्षण करते. असे वक्तव्य श्रमिक क्रांती आभियानाचे मारुती गुंडीले यांनी केले. ते पुढे म्हणाले,या संविधान संवर्धंनाची व रक्षणाची जिम्मेदारी आपल्यावर अवलंबून असते. संविधनाने दिलेले मुल्य हे महिलांच्या जीवन सुरक्षा व उन्नतीचा मार्ग आहे.भारताच्या प्रत्येक व्यक्ती जीवनावर संविधानिक मुल्य चांगला प्रभाव टाकुन, माणसा माणसातील भेद नष्ट होईल असे महत्वाचे पाऊल टाकले आहे. देशात बंधुभावाची जोपासना संविधानामुळेच होत असते.देशाची एकता व एकात्मता टिकवुन ठेवण्याचे महान कार्य भारतिय संविधानांने केले आसल्याची भावना ही त्यांनी यावेळी व्यक्त केली.एवढे महान संविधान आपल्या देशाला लाभले आहे. असे असताना देखील रुढी व परंपरा टिकवुन ठेऊ पहाणारी व विषमतेचं समर्थन करणारी मानसिकता भारतातील काही लोकात निर्माण झाली आसल्याचे दुख ही त्यांनी यावेळी व्यक्त केले. लोकांच्या विचारात बदल घडवुन त्यांना संविधान संवर्धनाच्या कामी उपयोगात आणुन त्यांना समतेचा मार्ग दाखवावा,प्रत्येक घरात संविधानाची प्रत आसावी. ती वाचन करावी, अशी आशा ही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
या सत्राचे आयोजन मीना वाघमारे, आश्विनी वाघमारे यांनी जळकोट पंचायत सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.प्रथम राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष बालाजी गुडसुरे हे होते. याप्रसंगी कासा मुंबई चे वैजनाथ डावकरे,शितलताई गोस्वामी,विष्णु आदावळे, सुजाता वाघमारे,संग्राम नामवाड,हरिभाऊ राठोड,शारदाताई मुंगे,पत्रकार आविनश तोगरे,लक्ष्मण रणदिवे, मारुती सुर्यवंशी,शांताबाई बिजले,पोर्णिमा सोनकांबळे,नीता खोब्रागडे,मंगलताई सोनकांबळे, शोभा तोगरे,सुमनबाई सोनकांबळे,शकुंतला कांबळे इत्यादी महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन संतोष गायकवाड यांनी केले तर मारुती गुंडीले यानी आभार व्यक्त केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *