उदयगिरीच्या प्राध्यापक प्रबोधिनीत प्रा.डॉ.जेवळीकर यांचे व्याख्यान संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या प्राध्यापक प्रबोधिनीत लोकप्रशासन विभाग प्रमुख प्रा.डॉ.गौरव जेवळीकर यांचे यशवंतराव चव्हाण जीवन आणि कार्य या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ.आर.के.मस्के हे होते, तर मंचावर उपप्राचार्य एस.जी.कोडचे उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. जेवळीकर म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांनी घेतलेल्या निर्णयामुळे आधुनिक महाराष्ट्राची उभारणी झाली. समाज कल्याणाची तळमळ, विकासाचा विचार यामुळे त्यांनी घेतलेल्या अनेक दूरगामी निर्णयाचा महाराष्ट्राला फायदा झाला. यावेळी अध्यक्षीय समारोपात बोलताना डॉ.मस्के म्हणाले यशवंतराव चव्हाण सर्व स्पर्शी, समाजाभिमुख आणि साहित्यिक असे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. त्यांच्या विचारापासून प्रेरणा घेऊन काम केले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. सूत्रसंचालन आणि आभार प्रा.डॉ.हमीद आश्रफ यांनी मानले.