सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलकावरील गुन्हे परत घेण्याबाबत उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्यपालाना निवेदन

0
सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलकावरील गुन्हे परत घेण्याबाबत उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्यपालाना निवेदन

सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलकावरील गुन्हे परत घेण्याबाबत उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्यपालाना निवेदन

उदगीर (एल.पी.उगीले) : जळकोट, देवणी व उदगीर तालुक्यातील मराठा आंदोलकावर बेकायदेशररित्या दाखल झालेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे. याबाबत सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले. तसेच सकल मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे, यासाठी महाराष्ट्रभर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाची परवानगी घेऊन व प्रशासनाला सहकार्य करीत शांततेच्या मार्गाने रास्ता रोको आंदोलन केले होते. त्याबद्दल पोलीस प्रशासन तसेच वरिष्ठांना कळविण्यात आले होते. या संदर्भात कुठेही अनुचित प्रकार घडला नव्हता. तरीही आंदोलकावर वीस बावीस दिवसानंतर जळकोट, देवणी, उदगीर तालुका येथील युवकावर व कार्यकर्त्यावर बेकायदेशीर रित्या गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. या संदर्भात तात्काळ गुन्हे मागे घ्यावेत, अन्यथा समाजा रोष सहन करावा लागेल. समाज आंदोलकाच्या भूमिकेत आल्यास होणाऱ्या परिणामास सर्वस्वी शासन जबाबदार असेल. असे उदगीर उपविभागीय अधिकारी व तहसीलदार मार्फत राज्यपाल रमेश बैस यांना निवेदन देण्यात आले. यावेळी दत्ता पाटील, गोविंद बिरादार ,राम रावणगावे, नितीन मोरतळे, सतीश पाटील मानकिकर, राहुल बिरादार ,बाबासाहेब पाटील, आकाश माने, चिखले देविदास, विठ्ठल महाराज, गोपीनाथ बिरादार, दिनकर बिरादार ,प्रशांत बिरादार, राहुल अतणुरे, प्रमोद काळोजी, दत्ता सागर , कबनुरे भानुदास, अमोल पाटील ,पंकज कालनी ,पवन ढोबळे, शंकर मोरे इत्यादींच्या स्वाक्षरीने सदरील निवेदन देण्यात आले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!