6 वर्षांच्या लेकीचा गळा आवळला, नंतर बापानेही घेतला गळफास;लातूर शहरात घडलीय घटना

0
6 वर्षांच्या लेकीचा गळा आवळला, नंतर बापानेही घेतला गळफास;लातूर शहरात घडलीय घटना

6 वर्षांच्या लेकीचा गळा आवळला, नंतर बापानेही घेतला गळफास;लातूर शहरात घडलीय घटना

लातूर (प्रतिनिधी) : अवघ्या 6 वर्षांच्या मुलीला गळफास लावून वडिलांनीही गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना लातूर शहरात घडलीय. मुलीला गळफास लावल्यानंतर वडिलांनी जीवन संपवल्याच्या या घटनेने लातूरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. लातूरच्या मार्केट यार्ड लगत असलेल्या मोतीनगर भागातील एका 35 वर्षे वयाच्या वडिलाने आपल्या 6 वर्षे वयाच्या मुलीस बेडशीटने गळफास देऊन तिला ठार केले व स्वतः गळफास घेवून आत्महत्या केल्याच्या प्रकाराने या परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की, मार्केट यार्डाच्या दक्षिण गेटच्या समोर भुतडा कुटुंबीय राहते. यांचे याच परिसरात कोरे गार्डनसमोर इडली गृह आहे. अभय लखन भुतडा (वय 35) हा इडली गृहातून जवळच असलेल्या घरी आला. मुलीला इडली देतो व शाळेत नेऊन सोडतो असे कारण त्याने सांगितले. घरी आल्यानंतर त्याच्या मनात कोणता राग होता, काय कारण होते माहिती नाही. पण, आपल्या पोटच्या सहा वर्षे वयाच्या मुलीस अगोदर गळफास देऊन तिला ठार केले व स्वतः गळफास घेवून आत्महत्या केली.

अभय लखन भुतडा याने स्वतःच्या मुलीस ठार करून स्वतःही आत्महत्या केली. हा प्रकार का घडला या प्रकारामागे ने नेमके कारण काय? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. भुतडा परिवार मोठा असून त्यांची या परिसरात मोठी इमारत आहे. बहुदा आर्थिक कारणावरून असा निर्णय अभय भुतडा यांनी घेतला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. त्यानंतर गुन्हा दाखल होईल. या घटनेमागे नेमके कारण काय हे पोलीस तपासातच निष्पन्न होईल, असा अंदाज लावण्यात येत आहे. या घटनेच्या वेळी अभय भुतडा यांची पत्नी याच परिसरात असलेल्या माहेरी गेली होती, असेही सांगण्यात येते. या घरातून वडील व मुलीचे प्रेत बाहेर काढत असताना परिसरात उपस्थित महिला, पुरूष हळहळ व्यक्त करीत होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *