पहिल्या मराठवाडा मॉय थाई मार्शल आर्ट चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये पोदार इंटरनॅशनल स्कूल अंबाजोगाई चे यश
लातूर (एल.पी.उगीले) : येथे महाराष्ट्र मॉय थाई असोसिएशनच्या वतीने पहिल्या मराठवाडा मॉय थाई मार्शल आर्ट चॅम्पियनशिप स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले. तसेच त्यांचे पुणे (पिंपरी चिंचवड) येथे एप्रिल महिन्यात होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. यात विविध वजन गटात स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले. यात मुलींमध्ये अंशिका उत्तरेश्वर देशमुख ( 16kg), तनशिका उत्तरेश्वर देशमुख(60kg),अनुष्का सुरवसे (24kg),आदिती राहुल कांबळे (22kg),धृती इंद्रजीत भगत (40kg), तन्वी मनोज इंगळे ( 25kg),अवनी दत्तात्रय सोनवणे(30kg),अन्वी प्रताप साखरे(25kg),रितीशा बालाजी अंबड (41kg), या विद्यार्थिनींनी सुवर्ण पदक प्राप्त केले. मुलांमध्ये राघव नितेश सपकाळ (22kg), युवराज माओज काटे(37kg), अभिषेक अरुण कुंभार (38kg),शेख सालिक रिजवान हुसेन(26kg),विराज रवींद्र मुंदडा (31kg),शौर्य बाळू कागदे (50kg),ध्रुव दिनेश कोथळे (28kg),आर्यन गणेश निकम (34kg), यश शंकर वाघमारे (43kg), अवनीश श्रीपाद देशमाने (25kg), वैशव चांगदेव मुंडे (36kg), शिवम शाम लोहिया(59kg) या विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक प्राप्त केले.
तसेच शुभश्री शंकर शिंदे (21kg), साक्षी राहुल कांबळे(29kg),तनया भागवत नागरगोजे (26kg) या विद्यार्थिनींनी रौप्य पदक प्राप्त केले. मुलांमध्ये ऋतुराज मनोज काटे (22kg),अभ्युदित विजय महंत (45kg),रेहान नईम सय्यद (36kg), गौरांग विनोदकुमार पाटील(43kg), या विद्यार्थ्यांनी रौप्य पदक प्राप्त केले. राजनंदिनी सचिन बनसोडे (32kg) या विद्यार्थिनीने कास्यपदक प्राप्त केले. तसेच शाळेच्या संघाने प्रथम क्रमांक प्राप्त केला. व द्वितीय स्थान लातूरच्या स्वामी विवेकानंद इंटिग्रेशन हायस्कूलने प्राप्त केले.
या विद्यार्थ्यांचे प्राचार्य कीर्तीकुमार देशमुख तसेच सर्व कोऑर्डीनेटर्स यांनी सत्कार केला, तसेच क्रीडा शिक्षक शेख मुखीद अब्दुल कादर व सर्व शिक्षक स्टाफ यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.