सात मे ला मतदान हक्क बजावू या…!
(चापोली येथे लोकगीतातून मतदार जनजागृती)
चापोली (गोविंद काळे) : लातूर लोकसभा विभागाच्यावतीने जिल्हातील मतदार बंधू भगिणीमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी स्वीप कलापथकाद्वारे चाकूर तालुक्यातील चापोली येथे प्रबोधनात्मक लोक गीताच्या माध्यमातून लातूर लोकसभा मतदारसंघातील मतदानाचा टक्का वाढण्यासाठी जनजागृती करण्यात आली.
यावेळी मतदारांनी शंभर टक्के मतदान करावे असे जाहीर आवाहन करण्यात आले.या अभियानांसाठी जिल्हाधिकारी वर्षा घुगे-ठाकुर मॅडम सहाय्यक निवडणूक अधिकारी मंजुषा लटपटे,अहमदपूर चे तहसीलदार शिवाजी पालेपाड,चाकूर चे तहसीलदार नरसिंग जाधव, गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघात जनजागृती कार्यक्रम करण्यात येत असून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वीपचे सदस्य महादेव खळुरे,शिवकुमार गुळवे,मोहन तेलंगे,बस्वेश्वर थोटे,शरद हुडगे,चंद्रकांत पेड,पुरुषोत्तम काळे,श्रीमती अर्चना माने,नागनाथ स्वामी,धनंजय नाकाडे
यांच्यासह तलाठी पी.एस.वैद्य,ग्रामसेवक एस.ए.कुरुळेकर व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. नागरिक महिला मतदार बंधू भगिणिनी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाला हजेरी लावली.