हाडोळती येथे प्रबोधनात्मक लोकगीतातून मतदार जनजागृती
अहमदपूर (गोविंद काळे) : केंद्रीय निवडणूक आयोगाचे (Election Commission of India) महाराष्ट्रात 26 एप्रिल ते 25 मे पर्यंत पाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार असून लातूर जिल्हातील मतदान 7 मे रोजी होणार आहे.लातूर लोकसभा विभागाच्यावतीने जिल्हातील मतदार बंधू भगिणीमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी स्वीप कलापथकाद्वारे अहमदपूर तालुक्यातील हाडोळती येथे प्रबोधनात्मक लोक गीताच्या माध्यमातून मतदारसंघातील मतदानाचा टक्का वाढण्यासाठी जनजागृती करण्यात आली.
यावेळी सुजाण मतदारांनी शंभर टक्के मतदान करावे असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात आले.
या अभियानांसाठी जिल्हाधिकारी वर्षा घुगे-ठाकुर मॅडम सहाय्यक निवडणूक अधिकारी मंजुषा लटपटे,अहमदपूर चे तहसीलदार शिवाजी पालेपाड,चाकूर चे तहसीलदार नरसिंग जाधव, गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघात स्वीप पथका तर्फे जनजागृती कार्यक्रम करण्यात येत असून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वीपचे सदस्य महादेव खळुरे,शिवकुमार गुळवे,मोहन तेलंगे,बस्वेश्वर थोटे,चंद्रकांत पेड,पुरुषोत्तम काळे,श्रीमती अर्चना माने,नागनाथ स्वामी,
यांच्यासह तलाठी व्ही.जे. घुमनवाड, मंडळ अधिकारी टी.पी.भंडारे व ग्रामस्थांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. गावातील प्रतिष्ठित नागरिक मतदार बंधू,नव मतदार बांधव भगिणीनी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाला उपस्थित होते.