शंभर टक्के मतदान होण्यासाठी स्वीप पथकाने केले लोकगीतातून आवाहन
चाकूर (गोविंद काळे) : केंद्रीय निवडणूक आयोगाचे (Election Commission of India) महाराष्ट्रात 26 एप्रिल ते 25 मे पर्यंत पाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार असून लातूर जिल्हातील मतदान 7 मे रोजी होणार आहे. जिल्हातील मतदार बंधू भगिणीमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी स्वीप कलापथकाद्वारे चाकूर तालुक्यातील मोहदळ व कबनसांगवी येथे लोकगीताच्या माध्यमातून लातूर लोकसभा मतदारसंघातील मतदानाचा टक्का वाढण्यासाठी जनजागृती करण्यात आली.
यावेळी मतदारांनी शंभर टक्के मतदान करावे असे जाहीर आवाहन करण्यात आले.या अभियानांसाठी जिल्हाधिकारी वर्षा घुगे-ठाकुर मॅडम सहाय्यक निवडणूक अधिकारी मंजुषा लटपटे,अहमदपूर चे तहसीलदार शिवाजी पालेपाड,चाकूर चे तहसीलदार नरसिंग जाधव, गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघात जनजागृती कार्यक्रम करण्यात येत असून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वीपचे सदस्य महादेव खळुरे,शिवकुमार गुळवे,मोहन तेलंगे,बस्वेश्वर थोटे,चंद्रकांत पेड,पुरुषोत्तम काळे,श्रीमती अर्चना माने,नागनाथ स्वामी,प्रमोद हुडगे,धनंजय नाकाडे आदिनी परिश्रम घेतले. गावातील नागरिक महिला मतदार बंधू भगिणिनी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाला उपस्थितीत होते.