उन्हाळ्यात पक्षांना जगवणारे पांगारा, पळस, काटेसावर हे वृक्ष जपलेच पाहिजेत – वृक्षमित्र प्रा अनिल चवळे

0
उन्हाळ्यात पक्षांना जगवणारे पांगारा, पळस, काटेसावर हे वृक्ष जपलेच पाहिजेत - वृक्षमित्र प्रा अनिल चवळे

उन्हाळ्यात पक्षांना जगवणारे पांगारा, पळस, काटेसावर हे वृक्ष जपलेच पाहिजेत - वृक्षमित्र प्रा अनिल चवळे

२१ मार्च जागतीक वन दिवस स्पेशल

अहमदपूर (गोविंद काळे) : सर्वत्र ऊन वाढत असताना शिशिर ऋतू मध्ये पानगळ होऊन झाडे निष्पर्ण होऊन सर्वत्र शुष्क वातावरण असले तरी या उन्हातही आपल्याला लाल शेंद्री फुलांनी शुष्क वातावरणात आनंदाचा शिडकाव करणारा पांगारा हा वृक्ष फुलांनी बहरून गेला . या फुलांकडे पाहून निश्चितच मनात एक आनंदाचा भाव निर्माण होतो. .

उन्हाळ्यात पाणी उपलब्ध नसते मात्र पक्षांना पाणी व अन्न पुरवणारे पांगारा, काटेसावर , पळस हे वृक्ष जपलेच पाहिजेत असे मत वृक्षमित्र प्रा अनिल चवळे यांनी जागतिक वन दिवसाच्या निमित्याने आमच्या प्रतिनिधी सी बोलताना व्यक्त केले .
आपल्या भागातील पांगारा हा एक महत्वाचे झाड असून त्याचे महत्व प्रा अनिल चवळे यांनी सांगितले
मराठवाड्यातल्या बालाघाट चा डोंगर रंगांमध्ये रस्त्याच्या कडेला शेतात खूपच आकर्षक सुंदर फुलांनी भरलेला पांगरा आपले लक्ष वेधून घेतो मध्यम उंचीचा हा वृक्ष उन्हाळ्यात पक्षासाठी अण्णाचा एक खूप मोठा स्त्रोत आहे .

आपल्या भागात आढळणारी पंगाराही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. यास नाजुक, सुन्दर लाल फुले येतात. पांगारा पर्णसंभार असल्यावर हिरवी शाल पांघरल्यागत वाटणारा हा वृक्ष. वृक्ष आपल्या हिशेबी जरी हा फारसा महत्त्वाचा नसला तरी त्याच्या सर्व अंगोपांगाच्या उपयुक्ततेचा विचार केला तर याचे महत्त्व पटते. पर्णसंभार नसताना येणारी लाल सॅटीनसारखी फुले मिरवणारा उघडा-बोडका पांगारा एखाद्या उघड्या अंगाच्या, कपाळावर लाल मळवट भरलेल्या पोतराजासारखा वाटतो. ही लाल फुले फुलपाखरे, पक्षी यांना आपल्याकडील मधामुळे आकर्षून घेतात आणि या पोतराजाचा खेळ पाहायला आपणही नकळत क्षणभर त्याच्यासन्निध थांबतोच थांबतो. पांगारा हा उष्ण प्रदेशातील वनामध्ये आढळणारा वृक्ष आहे. आपल्याकडे पांगारा जंगलात खडकातला, शहरातील बागेमध्ये, शेताच्या कुपणाला लावतात. चहाच्या मळ्याला सावलीसाठी लावलेला असतो. या वृक्षाचा प्रसार पश्चिम द्वीपकल्प भागातील कोकण व उत्तर कारवार येथील पानझडी व मिश्र जंगलात विशेषकरून आहे. पांगाऱ्याचा प्रवास तसा निसर्गातच होतो. पक्षी भुंगे फुलातील मध घेताना परागीकरण करतात. त्यातून धरलेल्या शेंगांमधील बी पडूनही रोपे होतात. पांगारा फांद्या लावूनही जगतो. पांगारा याच्यावर एकही पान नसताना लाल मनमोहक फुलांनी बहरतो. याच्या फुलांना गंध नसला तरी आपल्या मनाला त्याचा रंग मोहिनी घालतो. फेब्रुवारी ते एप्रिल या काळात पांगाऱ्याला फुले येतात. फुलांचा लाल रंग आणि मखमली वाटणाऱ्या पाकळ्या कुणालाही आपल्याकडे पाहायला लावतात. अंगावर जरी काटे असली तरी या ५०-६० फुट उंच वृक्षाच्या पानाच्या हिरवाईने त्याचा फुलाच्या लाल रंगाने आसमंत रसरसून उठतो. पांगाऱ्याला फार महत्त्वाचे स्थान आहे. याची साल तसेच पाने औषधी गुणधर्मयुक्त आहेत. विहीर बांधताना विहिराच्या पायाच्या घोळभागाला पांगाऱ्याची फळी वर्तुळाकार बसवतात. सालीतील धाग्यापासून दोर बनवतात. अशा पद्धतीने पांगारा हा अत्यंत महत्त्वाचा वृक्ष आहे. पांगारा हा उष्ण अग्निदीपक व कफ–कृमी-मेद नाशक आहे .

जेव्हा रानावनातील पाण्याचे साठे कोरडे पडतात, रानफुलांचा हंगाम संपूण जातो. माळरानावर, डोंगरावर वाळलेले गवत आणी शिशीरात झालेली पानगळीची वाळलेली पाने दिसू लागतात अशा वेळी ऋतुराज वसंताच्या स्वागतासाठी पळस, काटेसावर, पांगारा ही झाडे फुले लागतात.
रखरखत्या उन्हात लाल गूलाबी सौदर्य निसर्गप्रेमीसाठी एक विलोभनीय निसर्गदर्शन असते. या तिनही फुलामध्ये इतर फुलांच्या तुलनेत पाणी तसेच मधुरसाचे प्रमाण जास्त असते आणी फुलांची रचनाही पक्षांच्या सोयीनूसार निसर्गाने केलेली असते त्यामुळे विविध पंक्ष्याचा मुक्त संचार या झाडावर आपणास दिसून येतो.
पाने, फुले, झाडाची साल औषधी गुणानी युक्त आहे. झाडांच्या फांदीपासून किंवा बियापासून नविन रोपे बनवता येतात.

जेव्हा रानावनातील पाण्याचे साठे कोरडे पडतात, रानफुलांचा हंगाम संपूण जातो. माळरानावर, डोंगरावर वाळलेले गवत आणी शिशीरात झालेली पानगळीची वाळलेली पाने दिसू लागतात अशा वेळी ऋतुराज वसंताच्या स्वागतासाठी पळस, काटेसावर, पांगारा ही झाडे फुले लागतात.
रखरखत्या उन्हात लाल गूलाबी सौदर्य निसर्गप्रेमीसाठी एक विलोभनीय निसर्गदर्शन असते. या तिनही फुलामध्ये इतर फुलांच्या तुलनेत पाणी तसेच मधुरसाचे प्रमाण जास्त असते आणी फुलांची रचनाही पक्षांच्या सोयीनूसार निसर्गाने केलेली असते त्यामुळे विविध पंक्ष्याचा मुक्त संचार या झाडावर आपणास दिसून येतो.
पांगारा हा पानझडी वृक्ष असून याच्या फांदयावर लहान लहान विरळ काटे असतात. पाने जवळपास पळसाच्या पानाशी सगंत दिसतात त्यामूळे याला कूठे कूठे पळस पांगारा असेही म्हणतात. फेब्रूवारी ते एप्रिल मध्ये निष्पर्ण झाडाच्या शेंडयावर कळया-फुलांचे गुच्छ दिसू लागतात. फुले गळून पडली की शेंगा घोसाने येतात त्यात तपकीरी रंगाच्या बिया येतात, कच्च्या शेंगेतील बिया कांही पक्षी आवडीने खातात.
पाने, फुले, झाडाची साल औषधी गुणानी युक्त आहे. झाडांच्या फांदीपासून किंवा बियापासून नविन रोपे बनवता येतात.प्रकार आणि चित्रित पानांचा दुसरा प्रकार हे लागवडीत आहेत. मिरवेल, नागवेल, द्राक्षवेल व जाईजुई इत्यादींवा आधार देण्यास आणि चहा व कॉफीच्या मळ्यांत सावलीकरिता ही झाडे लावतात. पाने गुरांना खाऊ घालतात. तसेच त्यांचे खतही बनवितात. पाने सारक (पोट साफ ठेवणारी), मूलत्र (लघवी साफ करणारी), कृमिघ्न (जंत वगैरे मारणारी), आर्तवजनक (विटाळ सुरू करणारी) आणि दुग्धवर्धक असतात. सासर्गिक रोगातील सांधेदुखीवर व गाठीवर पाने बाहेरून लावतात. कानदुखीवर व दातदुखीवर पानांचा ताजा रस गुणकारी असून जखमांतील किडे मारण्यासही उपयुक्त असतो. साल ज्वरनाशक,पित्तनाशक, कृमिघ्न असते; नेत्रदाहात (डोळ्यांची जळजळ होण्यावर) तिचे अंजन घालतात. कच्च्या बिया विषारी असतात; परंतु उकळून व भाजून खातात. लाकूड पांढरे, हलके व टिकाऊ असल्याने पालखीचे दांडे, नक्षीकाम, फळ्या, खेळणी, पेट्या, नौका-बांधणी, तराफे, पडाव इत्यादींसाठी उपयुक्त असते. पोहावयास शिकताना याचे लाकूड वापरतात. साल कातडी कमाविण्यास व रंगविण्यास आणि त्यातील धागे दोऱ्याकरिता वापरतात. फुलांपासून लाल रंग काढतात. हा वृक्ष सु. २ मी. उंच वाढल्यापासून फुले येऊ लागतात. याच्या लागवडीमुळे जमीन सुपीक होते.

असे हे दुर्मिळ होत चाललेले पांगारा, पळस, काटेसावर जे उन्हाळ्यात पक्षाच्या पाणी आणि अन्न मिळण्याचा स्त्रोत असतो यांना जपणे अत्यंत गरजेचे आहे.

जागतीक वन दिवसाच्या निमिताने रेणापूर येथिल वृक्ष संवर्धन तज्ञ शिवशंकर चापुले यांनीही भारतीय वृक्ष जपलेचं पाहिजेत असे सांगितले .

कोट

महाराष्ट्रात सर्वत्रच आढळणारा, पर्यावरण संतुलन साठी अत्यंत उपयोगी असणारा पांगरा, काटेसावर हे वृक्ष उन्हाळ्यात पक्षासाठी पाणी, अन्नाची सोय करतो. जैवविविधतेमध्ये या वृक्षाचे खूप मोठे स्थान आहे.
यामध्ये पांढऱ्या फुलाचा पांगारा हा तर अत्यंत दुर्मिळ व नष्ट होण्याच्या मार्गावर आहे .त्याचेही संगोपन करणे गरजेचे आहे.
सर्व देशी वृक्ष शासनाने रस्त्याच्या दोन्ही बाजूला वृक्ष लागवड करताना लागवड करून निसर्गामध्ये महत्त्वाचे असलेल्या या झाडांना जीवनदान दिले पाहिजे.

शिवशंकर चापुले
वृक्ष संवर्धन तज्ज्ञ
रेणापूर .

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *