जयवंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ठिकठिकाणी पानपोई सुविधा
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योगपती जयवंतरावजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उदगीर शहर सुंदर शहर हरित शहर ही संकल्पना प्रत्यक्षात राबवण्यासाठी शहराच्या मध्यभागी असलेल्या राज्य मार्गाच्या दुभाजकामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली आहे. दरवर्षी वृक्ष लागवड, अन्नदान तसेच ठीक ठिकाणी पाणपोईच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. जयवंतराव पाटील मित्र मंडळाच्या वतीने गोरगरिबांना अर्थसहाय्य करणे, अन्नदान करणे असे कार्यक्रम दरवर्षी राबवण्यात येतात. यावर्षी आणखी मोठ्या प्रमाणात सामाजिक जाणीवा जोपासत त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम राबवण्यात आले. केवळ उदगीर शहरच नव्हे तर आजूबाजूच्या परिसरातही अनेक कार्यक्रम घेऊन लोककल्याणकारी योजना प्रत्यक्ष राबवल्या जात आहेत. ही अत्यंत कौतुकाची आणि अभिमानास्पद बाब आहे. उदगीर लगत असलेल्या देवणी तालुक्यातील येणाऱ्या गोरगरीब नागरिकांसाठी देवणी बसस्थानक येथे पाणपोईची सोय करण्यात आली असून जून महिन्यापर्यंत पाणपोई चालू ठेवण्यात येणार आहे. या पाणपोईचे उद्घाटन उद्योगपती बिपिन जयवंतराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी यशवंतराव पाटील, हवगिराव पाटील, शेषरावजी मानकरी, विजय कुमार लूले, भगवान बिरादार, दीपक मळभागे स्वामी, शिवाभाऊ कांबळे, श्रीमंतआना लुल्ले, योगेश तगरखेडे, करीम शेख, डी एल मेत्रे, तहसील कार्यालयाचे साळुंखे, बिजापुरे, पोलीस स्टेशनचे उत्सरगे, कांबळे, देवणी बसस्थानकाचे आगार प्रमुख पाटील, मेहत्रे व तालुक्यातील अनेक नागरिक या पाणपोई उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते.