महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात ग्रीन क्लब तर्फे जलदिन साजरा
उदगीर (एल.पी.उगीले) : महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागात जागतिक जलदिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. आर .बी .आलापुरे उपस्थित होते. ग्रीन क्लबचे समन्वयक डॉ. जे एम पटवारी, डॉ. व्ही एस नागपूर्णे, डॉ. ए यू नागरगोजे, डॉ. एस व्ही आवाळे हे उपस्थित होते. सूत्रसंचालन अक्षता जाधव या विद्यार्थिनीने केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. नागरगोजे यांनी केले. पाण्याचे महत्व, पाण्याची बचत, पृथ्वीच्या पृष्ठभागावर पाण्याचे वितरण यासंदर्भात माहिती सांगितली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. आर बी आल्लापुरे यांनी पाणी हे जीवन आहे, पाण्याचा काटकसरीने वापर करावा. राज्यांमधील व राज्य अंतर्गत पाणी संघर्ष या संदर्भात माहिती सांगितली. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.आर के मस्के यांनी जलदिनाचे महत्त्व सांगितले, व विद्यार्थ्यांना जल प्रतिज्ञा दिली. कार्यक्रमसाठी बहुसंख्येने विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विनोद अष्टुरे यांनी सहकार्य केले.