रुद्र व दाक्षायणी महिला मंडळाच्या वतीने नारी शक्तीचा सन्मान
घरात आणि समाजात नारींचा सन्मान करा सौ.चंदाताई बाबासाहेब पाटील यांचे प्रतिपादन
अहमदपूर (गोविंद काळे) : अनादी काळापासून भारतीय संस्कृतीमध्ये महिलांना अत्यंत मानाचे स्थान असून आजही या बदललेल्या समाज संस्कृतीमध्ये घरात आणि समाजात महिलांचा सन्मान करा असे आग्रही प्रतिपादन आमदारांच्या सौभाग्यवती चंदाताई बाबासाहेब पाटील यांनी केले. त्या दिनांक 21 रोजी रुद्र व दाक्षायणी महिला मंडळाच्या वतीने वीरशैव मंगल कार्यालयात जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील कर्तृत्वान नारींचा सन्मान सोहळ्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रुद्र महिला मंडळाच्या अध्यक्षा विजयाताई चवंडा व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या संचालिका प्रा.डॉ.सुनिता लोहारे-चवळे, माजी नगराध्यक्षा सुशीला चौधरी, माजी नगराध्यक्षा अश्विनी कासनाळे, विजया हामणे, स्वागताध्यक्षा संगीता अभय मिरकरले यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी विविध क्षेत्रातील कर्तृत्वान महिलांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थितांची मनोगत पर भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शासनाचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार विजेत्या आशा रोडगे- तत्तापूरे यांनी केले.सूत्रसंचालन सविता शेटकार यांनी तर आभार अध्यक्षा शिवानी चवंडा यांनी मानले.यावेळी आंतरराष्ट्रीय योग शिक्षिका वृषाली चवळे, संगीता खंडागळे, शितल मालू, सुनंदा कुलकर्णी, आशा आवाळे, आंतरराष्ट्रीय खेळाडू माही आरदवाड, जान्हवी जाधव, मधुरा करकनाळे, डॉ.नेहा पाटील, डॉ.वर्षा भोसले, डॉ.मयूरी चलवदे,डॉ.रुद्राणी शेटकार या कर्तत्वान नवदुर्गांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
सध्या काही महिला भगिनी भारतीय संस्कृतीच्या संस्कारापासून दुर जात आहेत म्हणून दाक्षायणी महिला मंडळाच्या सदस्यांनी 16 शृंगरा बद्दल चे वैज्ञानिक व अध्यात्मिक महत्त्व सांगितले आहे. या सोहळ्याला माजी उपनगराध्यक्ष अभय मिरकले,कपिल बिराजदार, सुनील शेटकार,प्रेमा वतनी, कलावती भातांब्रे यांच्यासह रूद्र व दाक्षायणी महिला मंडळाच्या सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.