मा. अशोकभैय्या शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली लातूर लोकसभा मतदारसंघाचे काँंग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार डाँं. शिवाजीराव काळगे यांच्या प्रचारार्थ निलंगा विधानसभा मतदारसंघातील शिरूर अनंतपाळ येथे “कार्यकर्त्यांची आढावा व नियोजन बैठक” संपन्न
शिरूर अनंतपाळ : शिरूर अनंतपाळ काँग्रेस कमिटीच्या वतीने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या संदर्भात “शिरूर अनंतपाळ तालुका आढावा व नियोजन बैठक” निलंगा मतदारसंघ कॉंग्रेस पक्षाचे प्रमुख नेते तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मा. अशोकभैय्या शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व प्रदेश सचिव अभयदादा साळुंके,डॉं.अरविंदजी भातम्बरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली…
यावेळी अशोकभैय्या पाटील निलंगेकर साहेब म्हणाले की,या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या माध्यमातून आपण सर्वांनी महाविकास आघाडीला पाठबळ देऊन सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. देशात सध्या मोठ्या प्रमाणात अराजकता माजविण्याचे काम सध्याचे भाजप सरकार हे करत आहे.सध्याच्या सत्ताधारी पक्षामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार करून देशात हुकूमशाही आणण्यासाठी कार्य केले जात आहे.देशात लोकशाही टिकवायची असेल तर संविधानाच्या माध्यमातून सर्वांना एकत्र येऊन लोकशाही बळकट करून सर्वांनी काँग्रेसच्या पाठीमागे ठामपणे उभे राहण्याची आज गरज आहे. तसेच या लोकसभेच्या निवडणुकीतच्या प्रक्रियेतून जात असताना आपल्या निलंगा विधानसभा मतदारसंघातील बूथचे योग्य व सूक्ष्म नियोजन लावणे गरजेचे आहे,असेही ते म्हणाले.
याप्रसंगी बैठकीदरम्यान शिरूर अनंतपाळ तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी मंत्री मा.श्री.अमितभैया देशमुख यांचा वाढदिवस शिवनेरी वरिष्ठ महाविद्यालय येथे केक कापून मोठया उत्साहाने वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी शि.अनंतपाळ तालुका काँंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष आबासाहेब पाटील उजेडकर,निलंगा तालुका काँंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, शिरुर अनंतपाळ तालुका काँंग्रेस माजी तालुकाध्यक्ष प्रभाकर बंडगर सर, माजी. जि.प.सदस्य रामभाऊ गायकवाड, प्रकाशदादा पाटील बाकलीकर, नगरसेवक. सुधीर लखनगावे, राजकुमार पाटील साकोळकर, ज्येष्ठ काँंग्रेस नेते. शिवराजआण्णा धुमाळे, काँंग्रेस जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील,डीसीसी बँंकेचे माजी. संचालक लक्ष्मणराव बोधले,किसान सेलचे जि.उपाध्यक्ष संजय बिराजदार, निलंगा पं. स. माजी सभापती अजित माने, माजी.पं.स.सदस्य रमेश सोनवणे,शहराध्यक्ष अशोक कोरे,सोमनाथ तोंडारे,वैशंपायन जागले,कार्याध्यक्ष अँंड. नारायण सोमवंशी, पंकज शेळके,निलंगा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल सोनकांबळे,युवक काँंग्रेस तालुकाध्यक्ष अँंड. सुतेज माने,युवक काँग्रेसचे सरचिटणीस भरत शिंदे,युवक जिल्हा काँंग्रेस उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, शि.अनंतपाळ काँंग्रेस सो.मिडिया तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, निलंगा विधानसभा काँंग्रेस सो.मिडिया उपाध्यक्ष आदेश जरीपटके,निलंगा ता.सो.मिडिया तालुकाध्यक्ष अमोल शिंदे,शिवाजीराव बानाटे,काशिनाथ जरीपटके,धोंडीराम ढोक, डाँं. बंडले संजय, तानाजीराव सा,कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते..