24 मार्च रोजी ढगेज् इंग्लिश अकॅडमीची “महागुरू परीक्षा”
स्पर्धा परीक्षा क्षेत्रात अनेक संधी आहेत यामध्ये सुद्धा करिअर घडविता येते — प्रा.सच्चीदानंद ढगे
लातूर (प्रतिनिधी) : प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी लातूर शहरातील व जिल्ह्यातील सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी लातूरच्या वतीने भव्य स्वरूपाची इंग्लिश महागुरू परीक्षा रविवार दिनांक 24 मार्च 2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे सदर परीक्षा ही दोन गटात घेण्यात येत असून सिनियर व ज्युनियर अशा दोन गटांमध्ये ही स्पर्धा परीक्षा होईल सकाळी 8 ते 10 या वेळेत सिनियर गटाची तर सायंकाळी 4 ते 6 या वेळेत ज्युनिअर साठी परीक्षा होणार आहे.
सदर परीक्षा ही संपूर्ण इंग्रजीच्या व्याकरणावर आधारित असणार आहे. विद्यार्थ्यांची तयारी या परीक्षेच्या माध्यमातून सर्व पाल्यांना आणि पालकांना सहज लक्षात येईल यासाठी अतिशय मोठ्या स्वरूपात मागील वर्षीही इंग्लिश महागुरु ग्रॅमर स्पर्धा परीक्षा आयोजित केली गेली होती या परीक्षेसाठी जिल्हाभरातील हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता याही वर्षी ही परीक्षा कधी होईल यासाठी अनेक विद्यार्थ्यांच्याकडून व पालकांच्या कडून विचारपूस होत आहे म्हणूनच ढगेज् इंग्लिश अकॅडमीच्या वतीने आता लवकरच दिनांक 24 मार्च 2024 रोजी पुन्हा जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत स्वरूपात ही स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे या स्पर्धेच्या माध्यमातून इंग्रजी विषयात आपल्या प्रतिभेला उंचविणारी पिढी घडणार असून या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन अकॅडमीचे संचालक प्रा. सच्चीदानंद ढगे आणि प्रा. विवेकानंद ढगे यांनी केले आहे.
कोरोनामुळे शिक्षणाच्या अनियमिततेमुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासात उदासिनात निर्माण झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रक्रियेला पुन्हा एकदा संजीवनी मिळवून देण्यासाठी लातूर आणि परिसरातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्लिश विषयाला मध्यवर्ती ठेऊन पुन्हा एकदा शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी
ढगेज् इंग्लिश अकॅडमीच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी “इंग्लिश महागुरू स्पर्धा” रविवार, दि. 24 मार्च रोजी होणार आहे. यासाठी 17 मार्च ते 23 मार्च याकाळात नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. या स्पर्धेचा उद्देश म्हणजे इंग्रजी व्याकरणाचा अभ्यास व त्याचे मूल्यमापन करता यावे. 100 गुणांची असणारी परीक्षा ही MCQ ( वस्तुनिष्ठ
बहुपर्यायी) स्वरूपात होणार आहे. यामध्ये सिनिअर महागुरू (८ वी आणि ९ वी ) या मोठ्या गटासाठी change the voice, tens, change the degree, question tag, clauses, Direct and Indirect speech आदी टॉपिक वर तर ज्युनिअर महागुरू ( ५ वी ते ७ वी) या लहान गटासाठी part of speech, verb’s forms, adjective forms, opposite words, change the degrees, question tag, WH Question आदी टॉपिकवर आधारित आहे. निःशुल्क असलेल्या या स्पर्धेसाठी ढगेज् इंग्लिश अकॅडमीच्या नारायण नगरच्या मुख्य शाखा आणि क्र.2 च्या सुतमिल कंपाऊंड लातूर शाखेत नोंदणी करण्यात येईल. नोंदणी करताना विद्यार्थ्यांनी दोन वॉट्सप्प नंबर देणे बंधनकारक आहे. सदरील परिक्षा
ढगेज् इंग्लिश अकॅडमीच्या नारायण नगरच्या मुख्य शाखा आणि क्र.2 च्या सुतमिल कंपाऊंड लातूर शाखेत सिनिअर साठी सकाळी 8 ते 10 तर ज्युनियर साठी 4 ते 6 या वेळेत संपन्न होणार आहे. परीक्षेला येताना विद्यार्थ्यांनी स्वतः पेन, पॅड सोबत घेऊन येणे अनिवार्य आहे. स्पर्धेत गुणानुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक आणि शैक्षणिक साहित्य देऊन मान्यवर अतिथींच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. दररोजच्या जीवनात जगताना आणि जागतिक स्तरावर स्पर्धा करताना दिवसेंदिवस इंग्रजीला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. त्याचबरोबर इंग्रजी भाषेला यामध्ये शालेय अभ्यासक्रम, MPSC, UPSC यासह विविध स्पर्धा परीक्षेत उज्ज्वल यश मिळवायचे असेल तर इंग्रजी विषयावर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. हाच उद्देश ठेऊन ढगेज् इंग्लिश अकॅडमीच्या वतीने भव्य अशी “इंग्लिश महागुरू स्पर्धा” आयोजित केली असून पालकांनी आपल्या पाल्याच्या भवितव्याच्या चांगल्या जडणघडणीसाठी व स्पर्धात्मक परीक्षेत उत्तम यश संपादन करता यावे कारण केवळ इंजिनियर बनणे किंवा डॉक्टर बनणे हाच उद्देश न ठेवता स्पर्धा परीक्षा या क्षेत्रात सुद्धा शेकडोसंधी आहेत त्यामुळे स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा करिअर घडवता येते, आणि कोणतीही स्पर्धा परीक्षा देण्याकरिता मूलभूत पाया पक्का पाहिजे व मूलभूत पाया म्हणजे इंग्रजी ग्रामर यासाठी इंग्लिश महागुरु स्पर्धा असो बेसिक इंग्रजी ग्रामर कोर्स असो ते आपण जरूर केले पाहिजे याच अनुषंगाने 24 मार्च ला होणाऱ्या महागुरु स्पर्धेसाठी
लवकरात लवकर नावनोंदणी करावी.असे आवाहन प्रा. सच्चीदानंद ढगे, व प्रा.विवेकानंद ढगे संचालक
ढगेज् इंग्लिश अकॅडमी, लातूर यांनी केले आहे.