गुंडगिरी करणाऱ्या सराईत गुन्हेगार ‘एमपीडीए’ कायद्याखाली स्थानबद्ध

0
गुंडगिरी करणाऱ्या सराईत गुन्हेगार 'एमपीडीए' कायद्याखाली स्थानबद्ध

गुंडगिरी करणाऱ्या सराईत गुन्हेगार 'एमपीडीए' कायद्याखाली स्थानबद्ध

लातूर (एल.पी.उगीले) : कायदा सुव्यवस्था आणि शांतता टिकून राहील या उद्देशाने समाजामध्ये अशांतता निर्माण करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या गुन्हेगाराच्या विरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. ही जिल्ह्यातील एम.पी.डी.ए. नुसार करण्यात आलेली सहावी कारवाई आहे. सार्वजनिक शांततेस धोका असल्याने जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी, लातूर वर्षा ठाकूर-घुगे यांनी त्याच्या स्थानबद्धतेचा प्रस्ताव मंजूरी दिली.
वाढत्या गुन्हेगारीला लगाम लावण्या साठी तसेच लोकसभा निवडणूक 2024 अनुषंगाने पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशान्वये एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी महाराष्ट्र झोपडपट्टी दादा (एमपीडीए) कायद्यांतर्गंत लातूर शहरातील पंकज श्यामसुंदर पारिख, (वय 25 वर्ष, राहणार भोकरंबा तालुका रेनापुर. सध्या राहणार पशुपतिनाथ नगर, लातूर) याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
एमपीडीए कायद्यांतर्गंत कारवाईचा शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणार्‍या गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी व त्यांची गुन्हेगारी रोखण्यासाठी लातूर पोलिसांकडून कडक प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. पंकज श्यामसुंदर पारीख याला ‘एमपीडीए’ कायद्याखाली एक वर्षासाठी स्थानबद्ध करुन त्याची रवानगी छत्रपती संभाजी नगर येथील हर्सूल कारागृहात करण्यात आली आहे. पोलीस अधिक्षक सोमय मुंडे यांच्या कार्यकाळात जिल्ह्यातील एमपीडीए नुसार करण्यात आलेली ही सहावी कारवाई आहे.
कुख्यात गुन्हेगार पंकज श्यामसुंदर पारिख, याच्या विरुद्ध जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यामध्ये अत्यंत गंभीर स्वरूपाचे एकूण 11 गुन्ह्यांची नोंद असून त्यामध्ये शस्त्रासह शरीरा विरुद्ध चे 5 गंभीर गुन्हे, मालमत्ता चोरी करण्याचे 2 गुन्हे, भारतीय हत्यार कायद्यान्वये 3 गुन्हे, तसेच खंडणी बाबतचा एक गुन्हा असे एकूण 11 गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. तसेच तो ट्युशन एरियामध्ये फिरून गुंडगिरी करण्याच्या सवयीचा होता, त्यामुळे जनसामान्यात त्याची भीती होती. त्याच्याकडून सार्वजनिक शांततेस धोका असल्याने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे निर्देशान्वये अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी (लातूर शहर)भागवत फुंदे, पोलीस ठाणे एमआयडीसी चे पोलीस निरीक्षक, साहेबराव नरवाडे,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, यांचे मार्गदर्शनात एमआयडीसी पोलिस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक राष्ट्रपाल लोखंडे, पोह विष्णू वायगावकर, दत्तनगिरे यांनी परिश्रम घेवून प्रस्ताव तयार करुन जिल्हाधिकारी यांचे कडे मंजूरी साठी पाठविला होता.
सदर प्रकरणी विशेष पथकाचे पोलीस अमलदार अर्जुन राजपूत, बेल्लाळे, युवराज गिरी, मुन्ना मदने, राजेश कंचे, गणेश साठे, संतोष देवडे, संतोष खांडेकर यांनी नमूद आरोपी ताब्यात घेण्यासाठी मदत केली. जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी, लातूर वर्षा ठाकूर घुगे यांनी त्याच्या स्थानबद्धतेचा प्रस्ताव मंजूर केला आहे. त्यावरून सदर आरोपीची 23 मार्च रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हर्सूल मध्यवर्ती कारागृहामध्ये रवानगी करण्यात आली आहे.
काय आहे एमपीडीए कायदा?

महाराष्ट्र झोपडपट्टीगुंड, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हिडिओ,पायरसी) वाळू तस्कर व अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणारे गुन्हेगार यांच्या विघातक कृतींना प्रतिबंध करण्या विषयीचा कायदा सन 1981 (सुधारणा 1996, 2009 व 2015) अंतर्गत स्थानबद्धतेचा आदेश म्हणजेच एमपीडीए (महाराष्ट्र प्रिव्हेंशन ऑफ डेंजरस अ‍ॅक्टिविटी) होय. सराईत गुन्हेगार किंवा सातत्याने सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था भंग करणार्‍या कोणत्याही व्यक्तीविरुद्ध एमपीडीएची कारवाई करता येते. या कायद्यानुसार सराईत गुन्हेगाराला एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात येते.
सतत गुन्हेगारी कृत्य करणारे गुंड प्रवृत्तीच्या व एकापेक्षा अधिक गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याची नोंद असलेल्या गुंड व्यक्तीं ची माहिती संकलित करून त्यांच्याविरुद्ध एमपीडीए (महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ डेंजरस अ‍ॅक्टिविटी) सारख्या कठोर कायद्यान्वये कार्यवाही करण्यात येत असून यानंतरही लातूर जिल्ह्यातील गुंडगिरी व भाईगिरी वृत्तीचा समूळ उच्चाटन करण्यासाठी समाजविघातक प्रवृत्तींना आळा घालण्याकरिता सदरची कार्यवाही करण्यात येणार असून लातूर पोलीस कडून जिल्ह्यातील धोकादायक गुंड व गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याची नोंद असलेल्या कुख्यात इसमांची माहिती संकलित करण्यात येत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *