दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेर्धात आम आदमी पार्टीचे निवेदन
अहमदपूर (गोविंद काळे) : शंभर कोटी रुपयांच्या कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यात ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी रात्री अटक केल्याच्या निषेर्धात आम आदमी पार्टीच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. याविषयी सविस्तर माहीती अशी की आम आदमी पार्टी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना शंभर कोटी रूपयांच्या कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याच्या आरोपाखाली गुरुवारी दिल्ली येथे ईडीच्या पथकाने त्यांच्या निवासस्थानी तब्बल दोन तास चौकशी करून अटक केली आहे. या अटकेच्या निषेर्धात आम आदमी पार्टी अहमदपूर यांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले की, भारत सरकारणे देशात अघोषीत आणीबाणी चालू केलेली आहे. लोकशाही वाचविण्यासाठी आवाज उठवणारे नेते कार्यकत्यांच्या विरोधात दडपशाही चालू केलेली आहे. कहर म्हणजे दिल्लीचे मुख्यमंत्री राष्ट्रीय नेते दिल्ली राज्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे विकास पुरुष आहेत व भ्रष्टाचार विरोधी काम करीत आहेत म्हणून बेकायदेशीर पणे दि. २१/०३/२०२४ रोजी त्यांना भारत सरकारने (ई.डी.) अटक केलेली आहे. सदर अटक बेकायदेशीर व लोकशाहीची हत्या करण्यात येत आहे म्हणून आम्ही अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध नोंदवित आहोत निवेदनावर आम आदमी पार्टी तालुका अध्यक्ष मनोहर पाटील , सचिव सुधाकर चोले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत यावेळी बि. आर.एस चे बाबुराव जंगापल्ले शिवसेना ( उबाठा ) चे प्रदिप चौकटे , उत्कर्ष शिंदे, हरिभाऊ कदम , ज्ञानेश्वर पवार,चेअरमन तरडे आदींची उपस्थिती होती.