वार्षिक स्नेहसंमेलन घेण्यासंदर्भात शिवाजी महाविद्यालयाच्या उपप्राचार्यांना निवेदन
उदगीर (एल.पी.उगीले) : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, उदगीर शाखेच्या वतीने शिवाजी महाविद्यालय येथे उपप्राचार्य मांजरे यांना ग्रंथालयात नविन आवृत्तीचे पुस्तके उपलब्ध करुन द्यावेत व वार्षिक स्नेहसंमेलन घेण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले. महाविद्यालयातील ग्रंथालयात महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि यू पी एस सी चे जुन्या आवृत्तीचे पुस्तक ठेवण्यात आले असून नविन आवृत्तीचे पुस्तके उपलब्ध करुन देण्यात यावेत, जेणेकरून विद्यार्थी नविन अभ्यासक्रमाच्या माध्यमातून चांगले गुण प्राप्त करतील. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी “वार्षिक स्नेहसंमेलन” आयोजित केले जाते, परंतु या वर्षी महाविद्यालयामध्ये वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले नाही. उन्हाळी परीक्षेच्या (द्वितीय सत्र) अगोदर हे संमेलन आयोजित करून २ दिवसात त्याचे पत्रक काढावे किंवा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आकरलेले शुल्क विद्यार्थ्यांना परत करावे. अन्यथा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तीव्र आंदोलन करेल. या आंदोलनाचे आपण व आपले प्रशासन जिम्मेदार राहाल असा इशारा या निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी लातूर विभाग संयोजक विशाल स्वामी, शहरमंत्री आदिनाथ मिरकले, सहमंत्री सुमित लाल, आदित्य पाटील, पृथ्वीराज बिरादार, सागर पटणे, सुदाम शिंदे, निखिल कसबे, वैभवी देशमुख, संध्या हत्ते यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.