देवणी तालुक्यात ११ अंगणवाड्या होणार डीजीटल !
देवणी (लक्ष्मण रणदिवे) : देवणी तालुक्यातील चिमुकल्यांना अद्यावत शिक्षण मिळणे सुलभ होण्यासाठी देवणी तालुक्यातील ११ अंगणवाड्या डीजिटल होणार आहेत. त्यामुळे या गावातील चिमुकल्यांना अद्यावत शिक्षण मिळणार आहे.
तालुक्यातील देवणी (खुर्द), विळेगाव, कमालवाडी, नागराळ, गुरदाळ, पेठेवाडी, खरबवाडी, या सात व गावा मधील ११ अंगणवाड्या डिजीटल होणार आहेत. या गावातील अंगणवाडीत शिक्षण घेणाऱ्या चिमुकल्यांना मोठा लाभ होणार आहे. डिजीटल उपक्रमाअंतर्गत अंगवाडीच्या भिंती बोलक्या करणे, टेलीव्हीजनच्या माध्यमातुन अद्यावत शिक्षण पद्धतीचा वापर करणे, चिमुकल्यांचे मोबाईलचे व्यसन कमी करुन त्यांनी टिव्हीच्या माध्यमातुन शिक्षणाच्या डिजीटल अंगणवाडी काळाची गरज मुळ प्रवाहात आणणे, डिजीटल बोर्डाचा नियमीत वापर करणे, अंगणवाडीत सोलार यंत्रणा कार्यान्वीत करणे या साठी विविध अद्यावत यंत्रणाचा समावेश आहे. अत्याधुनिक शैक्षणिक व भौतिक सुविधांनी युक्त अशा डिजीटल अंगणवाड्या तालुक्यात आकाराला येणार आहेत. यात मुलांचा वयोगट ओळखुन हसत खेळत शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत.
या अंगणवाड्या पूर्णतः डीजिटल राहणार असून तेथील भिंतीही बोलक्या राहणार आहेत. Dishonnats संपादित करा- नियमित अन सकारात्मक वापर होणे गरजेचे आहे. पालक व विद्यार्थ्यांचा इंग्रजी शाळाकडील वाढता ओढा कमी होण्यास मदत होणार आहे. अंगणवाडी शिक्षिकांनी यासाठी वेळ व मेहनत घेऊन पुढाकार घेणे गरजेचेआहे.वर्गात सोलारद्वारे विजपुरवठा केला जाणार आहे. बालवयातच बालकांना सुसंस्कारीत केले जाणार असुन त्यांनी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. ?
बालवयापासुन शाळेत येण्याची गोडी निर्मान केल्यास आगामी सुसंस्कारीत पिढी निर्मान होण्यास सकारात्मक वातावरण तयार होणार आहे. बालकांचा बोद्धीक पाया ज्या वयापासुन सुरु होतो, त्याचा सर्वांगीन बौद्धीक व शैक्षणिक विकास होण्यासाठी निंतात गरज आहे.