दिवाणी व फौजदारी न्यायालय नूतन इमारतीचे उद्घाटन
देवणी (लक्ष्मण रणदिवे) : देवणी येथे उभारण्यात आलेल्या दिवाणी व फौजदारी न्यायालय इमारतीचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मंगेश पाटील यांच्या हस्ते झाले. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नीरज धोटे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लातूरचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विजय पाटील होते.
न्यायमूर्ती पाटील आणि न्यायमूर्ती धोटे यांच्या हस्ते फीत कापून आणि कोनशीला अनावरण करून इमारतीचे उद्घाटन झाले. यावेळी उपस्थितांनी इमारतीची पाहणी करून माहिती घेतली. तसेच न्यायमूर्ती पाटील आणि न्यायमूर्ती धोटे यांनी उपस्थित विधी अधिकारी, विधिज्ञ यांच्याशी संवाद साधला.देवणीचे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर अतिष खोल्लम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जी. जी. क्षीरसागर, निलंगाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर, एडवोकेट बालाजी येनगे औरंगाबाद हायकोर्ट, एडवोकेट शिवानंद मळभागे अध्यक्ष वकील संघ देवणी, पत्रकार रमेश कोतवाल, रेवन मळभागे, लक्ष्मण रणदिवे, एडवोकेट सतिश शिंगडे, देवणीतील सर्व वकील यावेळी उपस्थित होते.