सारिकाताई भोसले आणि अनिताताई स्वामी यांच्या निवडीबद्दल आनंद

0
सारिकाताई भोसले आणि अनिताताई स्वामी यांच्या निवडीबद्दल आनंद

सारिकाताई भोसले आणि अनिताताई स्वामी यांच्या निवडीबद्दल आनंद

उदगीर (एल.पी.उगीले) : स्वतंत्र भारताच्या रक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या आणि दिवंगत पंतप्रधान व्ही पी सिंगाच्या मानवतावादी विचारावर चालणाऱ्या अखिल भारतीय जनता दल पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत. यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाच्या अध्यक्षा सारिकाताई सिताराम भोसले यांची अ.भा. जनता दल महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी तर पुणे लोकसभा मतदारसंघाच्या अध्यक्षा सौ अनिताताई शिवराज स्वामी यांची महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी निवड करण्यात आली. ही निवड पुणे येथील पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा सौ शितलताई रोकडे यांच्या निवासस्थानी लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भात आयोजित केलेल्या बैठकीमध्ये करण्यात आली.ही निवड पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा सौ शितलताई रोकडे यांच्या शुभ हस्ते पुष्पहार व नियुक्तीपत्र प्रदान करून करण्यात आली.यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष के जे शिंदे कोनाळीकर, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विकास शिंदे कोनाळीकर, राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य गोविंद मसुरे, युवा मोर्चा प्रदेश सचिव माधव मसुरे, युवा मोर्चा प्रदेश सदस्य विशाल मोरे, युवा मोर्चा कंधार तालुकाध्यक्ष विकास शिंदे पाटील, यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या दोन्ही कर्तबगार महिलांच्या निवडीबद्दल उदगीर परिसरातील जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी आनंद उत्सव साजरा केला आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *