जय महाराष्ट्र लंच होम मध्ये अवैध दारु विकणा-यावर गुन्हा दाखल
हंडरगुळी (विठ्ठल पाटील) मागील कित्येक वर्षापासुन खुलेआम दारुची अवैधरित्या विक्री होत असतानाही संबंधित राज्य उत्पादन शुल्क खाते अर्थपुर्ण दुर्लक्ष करत असल्याची चर्चा होती. उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष कल्याणकर व सपोनी भिमराव गायकवाड यांच्या आदेशानुसार पथकाने कुमठा-शिवनखेड रोडच्या बाजुस उगीले पाटी जवळील जय महाराष्ट्र लंच होम मध्ये छापा टाकला. त्या वेळी संजय रोहीदास वाघमारे हा इसम दारुची अवैधरित्या विक्री करत असताना आढळुन आला.तसेच वरील आरोपीच्या ताब्यातुन देशी दारुच्या 21 बाटल्या जप्त करण्यात आल्या असुन आरोपीवर फिर्यादी राष्ट्रपाल विनायक कांबळे यांच्या फिर्यादीवरुन पो.स्टे.वाढवणा येथे गुरनं.91/ 24 कलम,65 (अ} (ई) महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील जमादार संजय दळवे हे करीत आहेत.