१७ बैल जातीचे गोवंश कत्तलीसाठी घेऊन जाणारा आयशर टेम्पो पोलीसाच्या जाळ्यात ; २३ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त

0
१७ बैल जातीचे गोवंश कत्तलीसाठी घेऊन जाणारा आयशर टेम्पो पोलीसाच्या जाळ्यात ; २३ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त

१७ बैल जातीचे गोवंश कत्तलीसाठी घेऊन जाणारा आयशर टेम्पो पोलीसाच्या जाळ्यात ; २३ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील शिरूर ताजबंद जवळील मोरेवाडी पाटीजवळ ३१ मार्चच्या पहाटे ५ : ०० वाजता सहाय्यक पोलीस अधिक्षक चंद्रकांत रेड्डी यांच्या पथकाने १७ बैल जातीचे गोवंश कत्तलीसाठी तेलंगणा राज्यात घेऊन जाणारा आयशर टेम्पो पकडला असुन २३ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन या संदर्भात अहमदपूर पोलीसांत प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम कायद्यानुसार पाच जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे

याविषयी पोलीसांकडून मिळालेली माहीती अशी की,
चाकुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस अधिक्षक चंद्रकांत रेड्डी यांनी पोलीस स्टेशन चाकुर व अहमदपूर हद्दीमध्ये बेकायदेशीर रित्या कत्तलीसाठी गोवंश प्राण्यांची वाहतुक करणाऱ्या वाहनांचा शोध घेऊन कार्यवाही करण्यासाठी पोलीस अधिक्षक सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदपूर पोलीस स्टेशनचे प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलीस अधिक्षक नवदीप अगरवाल यांच्या सहकार्याने पोलीस उपनिरिक्षक चिरमाडे,पोह गुंडरे विष्णु, पोकॉ श्रीमंत आरदवाड, पोकॉ शिंदे ,पोकॉ धडे आदींसह पथकाची नेमणुक करण्यात आली होती सदरील पथकाला गोपनीय खबऱ्यामार्फत एक आयशर टेम्पो गोवंश भरून कत्तलीसाठी उदगीर मार्गे तेलंगणा राज्यात जात आहे अशी माहीती मिळाली असता दि ३१ मार्चच्या पहाटे ५ : ०० वाजता शिरूर ताजबंद उदगीर रोडवरील मोरेवाडी पाटीजवळ सापळा रचुन १७ बैल जातीचे गोवंश भरलेला आयशर टेम्पो पोलीसांनी पकडला असून २३ लाख ५० हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरील प्रकरणी अहमदपूर पोलीस स्टेशन येथे पोहेकॉ सुर्यकांत बबनराव कलमे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 1. मोहसीन इक्बाल शेख वय 28 वर्षे व्यवसाय चालक व मालक रा. खाजा नगर सावदा ता. रावेर जि. जळगाव 2. सईद इशाक शेख वय 45 वर्षे व्यवसाय मजूर रा. वगारी ता. जामनेर जि. जळगाव 3. अखिल खलील शेख वय 27 वर्षे व्यवसाय मजूर रा. वगारी ता. जामनेर जि. जळगाव 4. सुपडू सेठ रा. जळगाव ५. मोहम्मद रफिक रा. जहिराबाद राज्य तेलंगणा आदी पाच आरोपीविरूध्द अहमदपूर पोलीसात प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० तसेच महाराष्ट्र पशु सरंक्षण अधिनियम १९९४ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास सहाय्यक पोलीस अधिक्षक नवदीप अगरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक स्मिता जाधव ह्या करीत आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *