सहाय्यक पोलीस अधिक्षक चंद्रकांत रेड्डीची दमदार कामगिरी ; सहा अवैद्य वाळु वाहतुक करणारे हायवा टिप्पर ताब्यात
अहमदपूर (गोविंद काळे) : चाकुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस अधिक्षक चंद्रकांत रेड्डी यांच्या पोलीस पथकाने दि ३१ मार्च रोजी पहाटे ५:०० वाजता तालुक्यातील शिरूर ताजबंद – उदगीर रोडवर गंगाखेड व लोहा येथील गोदावरी पात्रातुन अवैद्यरित्या उपसा केलेली वाळु सहा विना नंबर प्लेट अवैद्य वाळु वाहतुक करणारे वाळूने भरलेले हायवा टिप्पर पकडले असुन सदरील हायवा टिप्पर अहमदपूर पोलीस स्टेशन येथील आवारात उभे करण्यात आले असुन लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
याविषयी सविस्तर माहीती अशी की , चाकुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस अधिक्षक चंद्रकांत रेड्डी यांनी लातुर जिल्हा पोलीस अधिक्षक सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली चाकुर व अहमदपूर तालुक्यात अवैद्य धंद्यावर कार्यवाही करण्यासाठी अहमदपूर पोलीस स्टेशनचे प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलीस अधिक्षक नवदीप अगरवाल यांच्या सहकार्याने पोलीस उपनिरिक्षक चिरमाडे,पोह गुंडरे विष्णु, पोकॉ श्रीमंत आरदवाड, पोकॉ शिंदे ,पोकॉ धडे आदींसह पोलीस पथकाची नेमणुक करण्यात आली होती दि ३१ मार्च रोजी मध्यरात्री सदरील पथक गस्त घालत असताना अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद- उदगीर रोडवर उदगीर शहरात गंगाखेड व लोहा तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातुन अवैद्यरित्या रात्री अपरात्री उपसा केलेली अवैद्य वाळु विना नंबर प्लेट असलेल्या हायवा टिप्परने विक्रिस नेत असताना ३१ मार्च रोजी पहाटे ५: ०० वाजता सदरील पोलीस पथकाने अवैद्य वाळूने भरलेले सहा हायवा टिप्पर पकडून अहमदपूर पोलीस स्टेशनच्या आवारात आणुन उभे करण्यात आले असुन त्यात असलेला लाखोंचा टिप्पर सहीत वाळूचा साठा जप्त करण्यात आला आहे बातमी लिहेपर्यंत गुन्हा नोंद करण्यात आला नव्हता पुढील प्रक्रिया अहमदपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस अधिक्षक नवदीप अगरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदपूर पोलीस करीत आहेत.