संत तुकाराम महाराजांच्या अभंगातून विश्वकल्याणाचा संदेश – ह.भ.प. अनिल महाराज मुंढे
अहमदपूर (गोविंद काळे) : संत तुकाराम महा राजांनी सृष्टीतील चरा-चरांचा विचार करून त्यांच्या कल्याणाचे तत्वज्ञान सांगितले म्हणून त्यांना जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज असे म्हटले जाते. त्यांनी खऱ्या अर्थाने विश्व कल्याणाचा संदेश आपल्या अभंगातून दिला, असे प्रतिपादन अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयातील मराठी विभागातील ह. भ. प. प्रो. डॉ. अनिल मुंढे महाराज यांनी केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे महात्मा फुले महाविद्यालयाच्या सांस्कृतिक, राष्ट्रीय सेवा योजना व मराठी विभागाच्या वतीने प्राचार्य डॉ . वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या ‘संत तुकाराम बीज’ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी हे होते. तर ; मराठी विभागातील प्रो. डॉ.अनिल मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलतांना डॉ. मुंढे म्हणाले की, संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा जो डोळसपणे अभ्यास करतो, त्यालाच अर्थाने मानवता धर्म कळतो असेही ते म्हणाले.या कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोपाप्रसंग उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी म्हणाले की, संत तुकाराम महाराजांनी मानवांसह पशुपक्ष्यांचा आणि वृक्षवेलींचा ही विचार आपल्या अभंगातून व्यक्त केला.पर्यावरण संवर्धनाचे जागरूक वारकरी होते, असेही ते म्हणाले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते संत तुकाराम महाराजांच्या प्रतिमेस पुष्प व गुलाल अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाची प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. पांडुरंग चिलगर यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. बब्रुवान मोरे यांनी मानले. यावेळी डॉ. मारोती कसाब , डॉ. प्रशांत बिरादार, डॉ. संतोष पाटील, अजय मुरमुरे, चंद्रकांत शिंपी यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक , कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.