महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, पुणेच्या मराठवाडा विभागीय अध्यक्षपदी प्रा. डॉ. सुनिताताई चवळे- लोहारे यांची बिनविरोध निवड
अहमदपूर (गोविंद काळे) : महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा पुणेच्या पदाधिकाऱ्यांची व्यापक बैठक पुणे येथील कार्यालयात विभागाचे अध्यक्ष तथा माजी आमदार उल्हासदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली.त्यात महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा छत्रपती संभाजी नगरच्या मराठवाडा विभागीय अध्यक्षपदी श्री हावगी स्वामी महाविद्यालय, उदगीरच्या प्रा.डॉ. सुनिताताई चवळे लोहारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
या निवडीनंतर पुणे येथे माजी आमदार उल्हासदादा पवार यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पहार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
प्रा. डॉ. सुनिताताई चवळे या शिक्षण क्षेत्रातील अग्रेसर असलेल्या टागोर शिक्षण समितीच्या सहसचिव असून डॉ.एस.एस.एम. प्रतिष्ठानच्या त्या सचिव यासह शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचे उल्लेखनीय काम असल्याच्या कारणाने त्यांची या पदावर निवड करण्यात आली.
त्यांच्या या निवडीबद्दल माजी मंत्री बाळासाहेब जाधव,
आ.बाबासाहेब पाटील, आ.विक्रम काळे, भारत लिबरल एज्युकेशन सोसायटी उदगीरचे अध्यक्ष गुणवंतराव पाटील हैबतपुरकर, सचिव उमेश पाटील देवणीकर, संस्थेचे सन्माननीय पदाधिकारी व सदस्य महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. नामदेव येमेकर, उपप्राचार्य डॉ.अप्पा राव काळगापुरे,टागोर शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक सांगवीकर, सचिव शिक्षण महर्षी डी. बी.लोहारे गुरुजी, उपाध्यक्ष डॉ. भालचंद्र पैके, डॉ.एस. एस. एम. प्रतिष्ठानचे अध्यक्ष सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता अनिल मुळे , माजी सभापती अयोध्या केंद्रे, माजी नगराध्यक्ष अश्विनी कासनाळे, रुद्र महिला मंडळाच्या अध्यक्षा विजया चवंडा, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीयांच्यासह मित्र परिवाराने अभिनंदन आणि कौतुक केले आहे.