संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे एमटीएस ऑलंपियाड परीक्षेत नेत्रदीपक यश
श्रेयस देशमुख राज्यात पहिला तर सानिका खुर्दळे व श्रावणी भंडे राज्यात तिसरा
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी एमटीएस ऑलंपियाड परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवले आहे. श्रेयश अमोल देशमुख 300 पैकी 296 गुण घेऊन राज्यात सर्वप्रथम आला आहे. तर 300 पैकी 282 गुण घेऊन सानिका भानुदास खुर्दळे व श्रावणी हरिदास भांडे राज्यात तृतीय येऊन विद्यालयाच्या उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.
आनंदी मनोज कदम, तन्वी मनोज कुमार पस्तापुरे जिल्ह्यात प्रथम तर अविराज अविनाश राठोड व शोन सचिन देशमुख जिल्ह्यात द्वितीय आले असून पार्थ हनुमंत किरडे, श्लोक सुरेश आलापुरे, श्रेयस शिवानंद कावर जिल्ह्यात तृतीय आले आहेत.
यशस्वी विद्यार्थ्यांना त्रिगुणा मोरगे, सविता पाटील, अश्विनी घोगरे, शारदा तिरुके, वैष्णवी शिंगडे यांनी मार्गदर्शन केले आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थाध्यक्ष माननीय गणेश दादा हाके पाटील, सचिव प्राचार्या रेखाताई तरडे उपाध्यक्षा एडवोकेट मानसी हाके, गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे, तालुका समन्वयक कामाक्षी पवार, मुख्याध्यापक आशा रोडगे, मुख्याध्यापक मीना तोवर सह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.