खा. सुधाकर श्रृगांरे यांच्या अहमदपूर तालुक्यातील मतदारांच्या भेटीला उत्स्फूर्त प्रतिसाद.

0
खा. सुधाकर श्रृगांरे यांच्या अहमदपूर तालुक्यातील मतदारांच्या भेटीला उत्स्फूर्त प्रतिसाद.

खा. सुधाकर श्रृगांरे यांच्या अहमदपूर तालुक्यातील मतदारांच्या भेटीला उत्स्फूर्त प्रतिसाद.

अहमदपूर (गोविंद काळे) : लातूर लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी व महायुतीचे उमेदवार लोकप्रिय खासदार सुधाकरराव श्रृगांरे यांनी अहमदपूर शहरासह तालुक्यातील अनेक गावातील मतदारांच्या गाठी भेटी घेऊन संवाद साधला. सदरील भेटी दरम्यान मतदारांचा उत्स्फुर्त मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.
खा.सुधाकरराव श्रृगांरे यांना दुसऱ्यांदा खासदारकीची संधी मिळाल्यानंतर अहमदपूर तालुक्यातील मतदारांच्या गाठी भेटी घेण्यासाठी सर्व प्रथम अहमदपूर शहरात आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वि.दा.सावरकर, यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तर महात्मा बसवेश्वर चौकातील, स्व. गोपीनाथराव मुंडे चौकातील नामफलकांना खासदार सुधाकरराव श्रृगांरे यांनी पुष्पहार अर्पण करून नतमस्तक झाले. अहमदपूर शहरालगत असलेल्या राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज भक्तीस्थळावर जाऊन डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या संजीवन समाधीला आरती करून पुष्पहार अर्पण करून आशिर्वाद घेतल्यानंतर अहमदपूर शहरातील नामवंत असलेल्या निवडक वकील, डाॅक्टर,इंजिनिअर, व्यापारी , बुद्धीवंत लोकांच्या भेटी घेऊन मोठ्या प्रमाणात मतदान रुपी आशिर्वाद देण्याचे आवाहन खासदार सुधाकरराव श्रृगांरे यांनी केले.
भारतीय जनता पार्टी, युवा मोर्चा, ओबीसी मोर्चा, महीला मोर्चा,मागासवर्गीय मोर्चा, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई या महायुतीच्या पदाधिकारी व बजरंग दल,आर.एस.एस.हिंदूत्ववादी संघटना व कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात खासदार सुधाकरराव श्रृगांरे यांचे स्वागत केले.
लोकप्रिय खासदार सुधाकरराव श्रृगांरे यांच्या या सुसवांद दौऱ्यात माजी मंत्री बाळासाहेब जाधव, आमदार बाबासाहेब पाटील, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष दिलीपराव देशमुख, भाजपाचे प्रदेश प्रवक्ते तथा अहमदपूर विधानसभा निवडणुक प्रमुख गणेश दादा हाके पाटील,लोकसभा निवडणुक प्रमुख राहूल भैय्या केंद्रे, जिल्हा सरचिटणीस अॅड. भारत भाऊ चामे, माजी सभापती अशोक काका केंद्रे, युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष अमोल निडवदे,ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव ज्ञानोबा बडगिरे,प्रदेश सदस्य बाळासाहेब होळकर, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद गिरी, जिल्हा चिटणीस हणमंत देवकते,जिल्हा उपाध्यक्ष ओम पुणे,बालाजी पाटील चाकुरकर, तालुका अध्यक्ष प्रताप पाटील,शहराध्यक्ष सुशांत गुणाले, तालुका सरचिटणीस माणिक नरवटे, युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष रामानंद मुंडे, दत्तात्रेय जमालपुरे,मागासवर्गीय मोर्चाचे तालुका अध्यक्ष रामनाथ पलमटे,ओबीसी मोर्चाचे तालुका अध्यक्ष दत्ता खंदाडे, डॉ.सिद्धार्थ सुर्यवंशी,संतोष कोटगिरे,दत्ता गोरे,महीला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्षा उत्तराताई कलबुर्गे, जिल्हा उपाध्यक्षा पुष्पाताई तेलंग,प्रणीताताई बेबंळगे, तालुका अध्यक्षा जयश्री केंद्रे, पिंठू नाईक, परमेश्वर आढाव, यांच्या सह भारतीय जनता पक्षाचे, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, रिपाई, राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *