अल्पसंख्यांक प्रदेश सरचिटणीस पदी असलम शेख तर युवक सचीव पदी मुझम्मिल हाशमीची नियुक्ती
अहमदपूर (गोविंद काळे) : मुंबई प्रदेश कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. खा. सुनिल तटकरे यांच्या मान्यतेने माजी मंत्री बाळासाहेब जाधव व अहमदपूर चाकूर मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या शिफ़ारसी वरुन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यक प्रदेश सरचिटणीस पदी असलम मोहम्मद शेख व एडवोकेट मुझम्मील हाशमी यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या प्रदेश सचिव पदी नियुक्ती पत्र राज्याचे सहकार मंत्री मा.ना. दिलीप वळसे पाटिल, मदत व पुनर्वसन मंत्री मा. ना. अनिल पाटिल, अल्पसंख्यक प्रदेश अध्यक्ष इद्रिसभाई नायकवडी व युवकचे प्रांत अध्यक्ष सूरज दादा चव्हाण यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे नेते शेख अय्याज जहुर अहमद, माजी नगरसेवक जावेद बागवान, ग्रंथालय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष सय्यद नबी आदि उपस्थित होते. नूतन पदाधिकारी यांच्या निवडीबद्दल अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.