हंडरगुळी येथील बस थांबा अतिक्रमणाच्या विळख्यात
हंडरगुळी / विठ्ठल पाटील,
उदगीर ते लातुर व शिरुर ते अहमदपुर जाताना प्रवाशी जनतेला व बसेसला थांबण्यासाठी हक्काची जागा म्हणुन लाखो रुपये खर्चून जागोजागी बसथांबे उभारलेत. यामुळे त्या-त्या ठिकाणचे प्रवाशी ऊन,वारा,पाऊस या पासुन सुरक्षित असलेल्या बसथांब्यात थांबतात.मात्र हाळी व परिसराती ५० एक गावची प्रवाशी जनता मात्र प्रवाशी निवाऱ्या अभावी भर उन्हात व पावसात उघड्यावरच बसची वाट बघत थांबलेले व बसलेले दिसतात.कारण हंडरगुळी येथील वडगाव पाॅंईंट लगत खुप जुना १ बस थांबा आहे. गत कित्येक वर्षापासुन त्यात एका व्यापा-याने “कॅंन्टीन” साठीची जागा वार्षिक फक्त ३६००/-रु.अशा नाममात्र भाडे तत्वावर घेतल्याचे बोलले जाते.तसेच भाडे न देता फक्त एस.टी.खात्यातील कांहींना “मॅनेज” करुन बसथांब्यात अतिक्रमण करुन दुकाणदारी थाटली आहे. “कॅंन्टीन” ऐवजी अन्य धंदा कुणाच्या जोरावर चालतोय.? शासन दरानुसार भाडे वसुलची व बसथांबा अतिक्रमणमुक्त कारवाई करायची धमक, एस.टी.खात्याचे वरिष्ठ दाखवतील का.? व हा बसथांबा जनतेसाठी खुला करतील का ? सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे प्रवाशांना थांबायला जुन्या बसस्टॅंन्ड जवळचा बसथांबाच अतिक्रमणात बेपत्ता झाल्यामुळे या भागातील प्रवाशांना भर उन्हात घामाच्या धारा वाहत बसची वाट बघत उघड्यावर थांबावे लागत आहे.