स्थानिक गुन्हे शाखेची उत्कृष्ट कामगिरी , 3 लाख 60 हजार रुपये किमतीच्या 09 मोटरसायकल जप्त.
लातूर (एल.पी.उगीले) लातूर जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सतत आपल्या उत्कृष्ट कामगिरीने चर्चेत असते. या शाखेच्या वतीने चोरीस केलेल्या नऊ मोटारसायकली शोधण्यात यश आले आहे. या मोटार सायकलची अंदाजे किंमत तीन लाख 60 हजार रुपये असून चोरीचे तीन गुन्हे उघड करण्यात येईल स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे.
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की,पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला घडलेले मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्याकरिता पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते.
पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या विशेषतः मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता विशेष पथके स्थापन करून गुन्हे उघड करण्याचे प्रयत्न सुरू होते .
त्या अनुषंगाने सदर पथके माहितीचे संकलन करीत असताना, माहिती घेत असताना दिनांक 30/03/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की, मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील गुन्हेगार चोरलेली मोटरसायकल विकण्यासाठी एमआयडीसी परिसरात फिरत आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने दिनांक 30/03/2024 रोजी सदर पथक तात्काळ एमआयडीसी परिसरात पोहचून रोडवर मोटार सायकलसह थांबलेल्या इसमाला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, तो विधी संघर्ष बालक असून काडगाव तालुका जिल्हा लातूर येथील राहणारा असल्याचे समजले.तसेच त्यांच्या ताब्यात असलेल्या वाहना संदर्भाने विचारपूस केली असता सांगितले कि, सदरची मोटर सायकल सन 2021 मध्ये मौजे येलोरी तालुका औसा शिवारातून चोरी केलेली आहे. तसेच काही महिन्या पूर्वीच, मिनी मार्केट लातूर बार्शी रोड,लातूर येथून व लातूर शहरातील विविध ठिकाणाहून आणखीन आठ मोटारसायकली चोरी केल्याचे सांगितले.
त्यावरून गुन्ह्यातील नमूद विधी संघर्ष बालकास त्यांने विविध ठिकाणाहून चोरलेल्या मोटारसायकल बाबत विचारपूस करुन त्याने एमआयडीसी परिसरातील एका बंद कारखान्यात मध्ये लपवून ठेवलेल्या आणखीन आठ चोरीच्या मोटारसायकली ज्याची एकूण किंमत 03 लाख 60 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पोलीस ठाणे शिवाजीनगर व पोलीस ठाणे भादा व पोलीस ठाणे एमआयडीसी मधील मोटरसायकल चोरीचा प्रत्येकी एक गुन्हा असे एकूण तीन उघडकीस आलेला आहे. उर्वरित 6 मोटार सायकल संदर्भात तपास सुरू असून पुढील कार्यवाहीस्तव नमूद मुद्देमाल पोलीस ठाणे शिवाजीनगरच्या ताब्यात देण्यात आले असून संबंधित पोलीस ठाणेचे पोलीस पुढील तपास करीत आहेत.
सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे मार्गदर्शनात पोलीस अंमलदार राहुल सोनकांबळे, राहुल कांबळे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, योगेश गायकवाड, मनोज खोसे, नितीन कटारे, संतोष खांडेकर पोलीस ठाणे शिवाजी नगर चे पोलीस अमलदार युवराज गिरी, पोलीस ठाणे एमआयडीसी चे सफौ बेल्लाळे, पोलीस अमलदार अर्जुन राजपूत, पोलीस ठाणे रेणापूरचे पोलीस अमलदार मुन्ना मदने यांनी पार पाडली.