मोबाईलवर वेळ वाया घालण्या पेक्षा संताच्या संगतीत वेळ घालवा शेवट गोड होईल – इंद्रजित देशमुख
उदगीर (एल.पी.उगीले) : कित्येक जण आपल्या आयुष्यातील बराच वेळ हा मोबाईल खेळण्यात व जवळच्या लोकांना विसरून कोसो दूर असलेल्या लोकांना चॅटिंग करण्यात वेळ वाया घालवतात. याचा फायदा काहीच होत नाही, पण हाच वेळ जर संतांच्या संगतीत व ईश्वराच्या नामस्मरणात घालवला तर आयुष्याचा शेवट गोड झाल्या शिवाय रहाणार नाही. असे अनमोल वचन सुप्रसिद्ध व्याख्याते इंद्रजित देशमुख यांनी आपल्या व्याख्यानातून व्यक्त केले.
सुप्रसिद्ध व्याख्याते इंद्रजित देशमुख हे उदगीर तालुक्यातील वाढवणा बु. येथील जेष्ठ विधीज्ञ दिगंबरराव बिरादार यांच्या साईलिला निवासस्थानी आयोजित एकनाथ षष्टी निमित्त जमलेल्या भाविक भक्तांना आपल्या मधूर वाणीतून संबोधन करताना सांगितले की,आजकाल प्रत्येक जण जवळच्या व्यक्ती पासून फार दूर जात आहे.ख-या संपती पासून दूर जात आहे.आपली खरी संपती म्हणजे आपले सुख,सुख ज्यात आहे ते समजून घेत नाहीत.सध्या ते ऐहीक सुखाच्या मागे लागून आपले अध:पतन करून घेत आहेत.या अनमोल शब्दात त्यांनी मार्गदर्शन केले.इंद्रजित देशमुख यांचे आजवर महाराष्ट्रासह बाहेर राज्यात ही अनेक व्याख्यान झालेले आहेत.त्यांचा श्रोता वर्ग अफाट आहे.सामान्यातल्या सामान्य व्यक्यीलाही समजेल अशा शब्दात मार्गदर्शन करतात.यावेळी कराड येथील उपजिल्हाधिकारी म्हेत्रे हे ही उपस्थित होते.सदरील व्याख्यान विधीज्ञ दिगंबरराव बिरादार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.या कार्यक्रमाचे संचलन प्रा.डॉ.निवृती तिरकमटे यांनी केले.
वाढवणा बु येथील प्रा.प्रविण बिरादार, पत्रकार तथा विधीज्ञ प्रमोद बिरादार,तरूण बिल्डर प्रशांत बिरादार या बिरादार परिवार ने संतश्रेष्ठ शांती ब्रम्ह एकनाथ महाराज यांची षष्टीचा कार्यक्रम आयोजित केला होता. या परिवारने गेल्या 40 वर्षा पासून ही परंपरा चालू ठेवली आहे.या षष्टी निमित्य ह.भ.प.गणेश महाराज किणीकर यांचे किर्तन झाले. रात्री जागरण,गवळणी व भारूडाचा कार्यक्रम झाला. 31 मार्च रोजी सकाळी 9 ते 11 सुप्रसिद्ध व्याख्याते इंद्रजित देशमुख यांचे संत वाड:मय या विषयावर व्याख्यान झाले. सकाळी 11 ते 1 ह.भ.प.नामदेव महाराज उमरगेकर यांचे गुलालाचे किर्तन झाले. हा दोन दिवशीय धार्मिक कार्यक्रम पार पाडण्यासाठी बालाजी हावरगे,तुकाराम केसगिरे,ढोबळे गुरूजी,टिल्लू गायकवाड, प्रमोद मुंडकर,ज्ञानोबा संगमे,व्यंकटी पूंड,दत्तात्रय शिंदे,माधव नागपूर्णे,गंगाधर तरवडे,गोविंद लवटे,अमोल फुलारी,दिपक वाघडोळे, संतोष सोमासे,ईंद्रजित हाळणे,उल्हास कोंडेकर,किसन भारती,संग्राम चव्हाण आदींनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाला वाढवणा व परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.