संजय घोडावत आय.आय.टी. अँड मेडिकल अकॅडमीच्या ‘ करिअर गाइडन्स’ ला पालक व विध्यार्थाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
संजय घोडावत आय.आय.टी. अँड मेडिकल अकॅडमीच्या ' करिअर गाइडन्स' ला पालक व विध्यार्थाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

उदगीर (एल.पी.उगीले) : कोल्हापूर व संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात नामांकित असलेला संजय घोडावत आय.आय.टी. अँड मेडिकल अकॅडेमिची १४ शाखा असून नवीन शाखेचे उदगीर येथे उदघाटन झाले . याच संजय घोडावत ग्रुपचे मध्ये २०,००० हुन अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
संपूर्ण देशात सुप्रसिद्ध असलेले संजय घोडावत ग्रुप हे विविध क्षेत्रात कार्यरत आहे जसे की , संजय घोडावत युनिव्हर्सिटी ,मायनिंग ,टेक्सटाईल, पेट्रोलियम व एरलाईन्स (काही दिवसापूर्वीच नांदेड येथून ६ विविध शहरात विमान सेवा सुरु करण्यात आली आहे)
संजय घोडावत आय.आय.टी. अँड मेडिकल अकॅडमीतर्फे उदगीर येथे ‘ करिअर गाइडन्स’ हा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या संस्थेचे डायरेक्टर वासू यांनी १०वी नंतर पुढे काय करायचे ? कोणता कोर्स घ्यायचा ? कोणते क्षेत्र निवडायचे? ज्यामुळे त्या क्षेत्रात मुलांना यशस्वी होता येईल, या विषयी मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी ७०० पेक्षा अधिक विद्यार्थी व पालक उपस्थित राहून प्रचंड प्रतिसाद दिला. संस्थेचे विश्वस्त विनायकजी भोसले या प्रसंगी उपस्थित होते. तसेच उदगीरचे रहिवाशी आणि पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार श्रीकांत जोशी कार्यक्रमास उपस्थित होते, लातूर येथील प्रसिध्द स्री रोग तज्ञ राजेश दरडे,त्यासोबत उदगीर शहराचे आदर्श व्यक्तिमत्व व उद्योजक श्री महेश येरनाळे यानी मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास अविनाश तळणीकर उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना वासू सर म्हणाले की, उदगीरमध्ये आपण शैक्षणिक क्षेत्रात कायापालट करण्यासाठी प्रयत्न करू. सुत्र संचलन दुरूगकर मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन शाहीद यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *