संस्थेमुळेच मी मोठा झालो -लालासाहेब गुळभिले
उदगीर (एल.पी.उगीले) व्यक्तीची जडणघडण परिसरामुळे होत असते. माझी जडणघडण या संस्थेमुळे झाली. माझे नाव लोकिक ही संस्थेमुळेच झाले. असे विचार सेवानिवृत्त परिवेक्षक लालासाहेब गुळभिले यांनी व्यक्त केले. ते लाल बहादुर शास्त्री माध्यमिक विद्यालयात पर्यवेक्षक लालासाहेब गुळभिले गुरुजी यांचा सेवापूर्ती कार्यगौरव सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष मधुकरराव वट्टमवार, प्रमुख अतिथीस्थानी केंद्रीय कार्यकारीणी सदस्य तथा स्थानिक समन्वय समितीचे कार्यवाह शंकरराव लासुने, प्राथमिक शालेय समिती अध्यक्ष व्यंकटराव गुरमे, सत्कारमूर्ती लालासाहेब गुळभिले, त्यांच्या सुविद्य पत्नी रंजना गुळभिले, चिरंजीव अक्षय, आदित्य, कन्या आश्लेषा, केशवराज माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रदीप कुलकर्णी, केशवराजचे पर्यवेक्षक दिलीप चव्हाण, संदीप देशमुख, बबनराव गायकवाड यांची उपस्थिती लाभली. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक आंबादास गायकवाड, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे, उपमुख्याध्यापक संजय कुलकर्णी, पर्यवेक्षक कृष्णा मारावार, माधव मठवाले यांची विशेष उपस्थिती होती.
मनोगत व्यक्त करताना नीता मोरे म्हणाल्या, ” गुळभिले गुरुजी म्हणजे कार्यमग्नता, जीवन व्हावे मृत्यू ही विश्रांती, अशा तत्वाने वागणारे व फळाची अपेक्षा न करता विद्यालयाला यशोशिखरावर नेणारी व्यक्ती होय.” तर प्रदीप कुलकर्णी त्यांच्या मनोगतात म्हणाले, ” काही मूर्ती स्वयंभू असतात. सचोटीने काम करणारे,निरपेक्ष वृत्तीने,समर्पण भावनेने, कार्य करणारे व्यक्तिमत्व म्हणजे गुळभिले गुरुजी होय.” स्वतःच्या सेवापूर्तीच्या मनोगतात पुढे बोलताना गुळभिले गुरुजी म्हणाले, ” इथल्या लोकांमुळे मी घडलो. विद्यालयामुळे नावारूपाला आलो. कर्मावर विश्वास ठेवून कृती केली. संस्था व विद्यालयातील प्रत्येक घटकाचे सहकार्य मला लाभल्यामुळे,मी समाधानी आहे.” अध्यक्षीय समारोपात मधुकरराव वट्टमवार म्हणाले, ” गुळभिले गुरुजींच्या लग्नापासून ते सेवापुर्ती पर्यंतचा मी साक्षीदार आहे. एक शांत,सुस्वभावी, सर्वांना सोबत घेऊन चालणारी व्यक्ती म्हणजे गुळभिले गुरुजी होय. “
या कार्यक्रमाचे संचालन अनिता मुळखेडे, प्रस्ताविक एकनाथ राऊत, स्वागत व परिचय प्रमोदिनी रेड्डी, वैयक्तिक गीत प्रीती शेंडे, आभार लक्ष्मीकांत कुलकर्णी यांनी मानले. किरण नेमट यांनी कल्याण मंत्राने कार्यक्रमाची सांगता केली.