अर्चना पैके यांचा स्वप्निल कोलते साहित्यरत्न पुरस्काराने गौरव
उदगीर (एल.पी.उगीले)
येथील व्यावसायिक व चोखंदळ वाचक अर्चना सिद्धेश्वर पैके (वारद) यांचा या वर्षीचा स्वप्निल कोलते साहित्यरत्न पुरस्कार न्यू इरा पब्लिकेशन हाऊस पुणे येथे गौरव करण्यात आला.
न्यू इरा पब्लिकेशनचे संस्थापक व तरूण उद्योजक ,लेखक शरद तांदळे आणि प्रकाशिका अमृता तांदळे यांनी दिवंगत तरुण लेखक स्वप्नील कोलते यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा पुरस्कार सुरू केला. एक लाख रुपये रक्कम व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते.उत्कृष्ट वाचकाचा शोध घेऊन हा पुरस्कार दिला जातो.
अर्चना पैके यांना वाचनाची प्रेरणा लहानपणीच आई- वडिलांपासून मिळाली. आई दुसरी शिकलेली असली तरी वाचनावर निष्ठा असलेली. त्यामुळे घरात वाचन संस्कृतिचे वातावरण निर्माण झाले. अर्चना यांची मुलं देखील सातत्याने कलाकृतीचे वाचन करतात. अर्चना पैके या उदगीर येथील वाचक संवाद, वाचन कट्टा या उपक्रमाशी देखील जोडल्या गेल्या आहेत. वाचलेली चांगली पूस्तके त्यातील माहिती त्या अंध मुलांना कथेच्या स्वरुपात सांगून त्यांच्यावर चांगल्या लेखनाचा संस्कारच करतात! वाचन,लेखन व व्याख्याने या माध्यमातून वाचन संस्कृती त्यातल्या त्यात बालकावर रूजविण्याचा प्रयत्न त्या सातत्याने करत असतात.
पुरस्कार तो पण दिवंगत मित्राच्या नावाने. त्याच्यातील संभाजी महाराजांच्या विचांरांना सतत तेवत ठेऊ इच्छिणारे लेखक शरद तांदळे एक वाचकास इतका सन्मान गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने करत आहेत, आणि आपण न्यू इरा प्रकाशनच्या ह्या सन्मानास पात्र ठरलो याचा आपणास अविस्मरणिय आनंद आहे,असे अर्चना पैके यांनी सांगितले.
उत्कृष्ट वाचक म्हणून संपुर्ण महाराष्ट्रातून त्यांना हा सन्मान प्राप्त झाला ! सन्मानाने हा गौरव केल्याबद्दल त्यांचे कुटुंबीय, मित्र , मैत्रिणी व उदगीरवासीयांनी अर्चना पैके यांचे अभिनंदन केले.