शिवाजी महाविद्यालयचे अखिल भारतीय अंतर विद्यापीठ स्पर्धेत यश.
उदगीर (एल.पी.उगीले) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अखिल भारतीय अंतर विद्यापीठ बेसबॉल महिला स्पर्धा नुकत्याच बारामती येथे संपन्न झाल्या. सदर स्पर्धेत शिवाजी महाविद्यालय उदगीरच्या कु. बुंदराळे प्रतीक्षा नरसिंग बी. ए. तृतीय वर्ष या खेळाडूचा सहभाग स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड च्या संघात होता,
सदर स्पर्धेत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या संघाने चतुर्थ क्रमांक पटकावले. या खेळाडूच्या यशाबद्दल खेळाडूंना नेहमी प्रोत्साहित करणारे किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील, उपाध्यक्ष माधवराव पाटील, सचिव पांडुरंग शिंदे, कोषाध्यक्ष गुंडेराव पाटील व सर्व कार्यकारिणी सदस्य, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अरविंद नवले, उपप्रचार्य प्रा. डॉ. एस. व्ही. जगताप, प्रा. डॉ. आर. एम. मांजरे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. विलास भोसले, पर्यवेक्षक प्रा. जि. जी. सूर्यवंशी, शिक्षक व कर्मचारी विद्यार्थी यांनी अभिनंदन केले. खेळाडूला क्रीडा विभाग प्रमुख प्रा. नेहाल अहमद खान , प्रा. गजानन माने यांनी तंत्रशुद्ध पद्धतीचे मार्गदर्शन केले.